Tuesday, 18 May 2021

भिवंडीतील कारीवली येथून जिलेटीन स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त.!

भिवंडीतील कारीवली येथून जिलेटीन स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त.!


अरुण पाटील,भिवंडी :
          भिवंडी येथील कारिवली गाव या ठिकाणी ठाणे गुन्हे शाखा, युनिट -1या पोलीस पथकांनी मध्य रात्री टाकेलेल्या धाडीमध्ये  जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12 हजार कांड्या जप्त केल्या आहेत. त्याच बरोबर 3008 डेटोनेटर्स देखिल या ठिकाणी भरून ठेवलेले आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा स्फोटकांचा साठा एवढा मोठा होता, की तो पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का  बसला. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे.
     ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकाऱ्यांना  मिलाळालेल्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री नंतर सुमारे दीड वाजेच्या सुमारास भिवंडी येथील कारवली गांव येथील मित्तल इंटरप्राइजेसच्या गोदामात धाड टाकली असता त्या ठिकाणाहुन  पोलिसांनी   जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12 हजार कांड्या जप्त केल्या. त्याच बरोबर 3008 डेटोनेटर्स देखिल या ठिकाणी भरून ठेवलेले आढळले.
             या बाबतची  माहिती लगेचच BDDS अर्थात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. या ठिकाणी ही सर्व स्फोटकं अवैधरित्या साठवली होती. ती जप्त करून वाडा येथील सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आली आहेत.पोलिसांनी या प्रकरणी गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे(वय -53, रा. कालवार ) याला  अटक केली आहे. त्याला  न्यायालयानं 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
            गुरुनाथ म्हात्रे व्यवसायानं खाणी आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. त्या साठी त्यांनी हा माल साठवला असल्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे. मात्र हा माल अनधिकृतरित्या साठा करून ठेवला असल्याने त्यांच्यावर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही माहिती दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा करून ठेवणं धोकादायक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !! पुणे, प्रतिनिधी : केंद्र शासना...