ठाणे जिल्ह्यात तेरा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, भिवंडी तालुक्यातील सावाद येथे चार प्लॅन्ट !
कल्याण, (संजय कांबळे) : प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज काय असते हे कोरोनाच्या दुसर्या लाटेत आपल्या देशाला समजले. या लाटेत अनेकांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला. अशातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये. महाराष्ट्र ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी शासनाने हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ३८ पीएसए कार्यान्वित केले असून दिवसाला ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
यातील १३ प्लॅन्ट हे ठाणे जिल्ह्यात असून भिवंडी तालुक्यातील सावाद करोना कोविड सेंटर मध्ये ४ तर ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल येथे २ प्लॅन्ट सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरीत हे महानगरपालिका क्षेत्रात असणार आहेत. त्यामुळे भविष्यात तरी ठाणे जिल्ह्यातील कोरोना पेशंट ना भरपूर ऑक्सिजन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुया.
महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाच्या संकटामुळे तसा फारसा परिणाम झाला नाही. परंतु यानंतर आलेल्या दुसर्या लाटेत कोरोना पेंशट भयानक वाढले. काही जिल्ह्य़ात तर कोरोनाचा विस्फोट झाला. ठाणे जिल्हा देखील हाॅस्पाट होण्याच्या मार्गावर होता. शहरासह ग्रामीण भागातील ५ तालुक्यातील प्रत्येक गाव कोरोना ने गाठले. कल्याण तालुक्यातील तर म्हारळ, गोवेली, वरप, कांबा, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री, जांभूळ, चवरे, म्हसकळ, अनखरपाडा, खडवली, फळेगाव गेरसे कोसले, गुरवली पाडा, दानबव, भिसोळ, असे एकही गाव शिल्लक राहिले नाही. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णांना कोठेही व्हॅन्टेलिटर बेड, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला. कल्याण मधील वरप, मुरबाड येथे कोविड सेंटर सुरू झाले खरे पण तेथे आॅक्शिजन बेड नसल्याने पेंशट ला ठाणे सिव्हिल किंवा भिवंडी मधील सावाद येथे पाठवले जायचे पण इकडेपण तिच अवस्था, ऑक्सिजनची कमतरता, बेड नाही, व्हॅन्टेलिटर नाही. अशीच उतरे ऐकायला मिळाली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनासाठी भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ८९१ बेडचे कोरोना कोविड सेंटर सुरू झाले खरे. यातील केवळ १९० बेड ऑक्सिजनचे आहेत. परंतु यातील किती बेड ग्रामीण पेंशट ला मिळतात हे न बोललेलं बरं? दुसरे ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल, येथे एकूण ३०० बेड पैकी ३९ बेड व्हॅन्टेलिटर तर १५० बेड ऑक्सिजनयुक्त, त्यामुळे ते जिल्ह्याला कसे पुरणार? हा मोठा प्रश्न.
एकूणच काय तर लसीकरण आणि राज्याला ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण करण्याचा विचार महाविकास आघाडी सरकारच्या समोर आला. तिसरी लाट थोपवायची असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लसीकरण झाले पाहिजे या हेतूने कोरोना कोविड लसीकरण केंद्र सुरू झाली. आतापर्यंत राज्यातील २८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे तर सुमारे १ कोटी ६७ लाख ८१ हजार दुसरा डोस दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशात पुढे आहे. पण आॅक्शिजन चे काय? म्हणून शासनाने ३८ पीएस ए हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यातून दिवसाला ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.
यातील ठाणे जिल्ह्यातील १३ प्लांट असून भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ४ प्लांट तर ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल येथे २ प्लांट बसविण्यात येणार आहे.
प्रेशर स्विंग अड्सोरप्शन तंत्रज्ञानाव्दारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट साठी २२१ ते २२५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर बसवले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या प्राणवायू हा कोविड सेंटर ला पुरविण्यात येणार आहे. इतर ७ प्लांट हे सर्व महानगरपालिका क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आलीच तर किमान ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजन बेड अभावी तडफडून मरावे लागणार नाही. अशी दिलासादायक आशा व्यक्त करुया. तर ऑक्सिजन उपलब्ध झाला तरी नागरिकांनी बेफिकीर राहू नये. मास्क वापरावे, सोशलडिंस्टिंगचे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी करतात.
प्रतिक्रिया - *राजेश नार्वेकर (जिल्हाधिकारी, ठाणे) "ठाणे जिल्ह्यात १३हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून यातील ४ हे भिवंडी तालुक्यातील सावाद कोविड सेंटर तर २ ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल आणि उर्वरित महानगरपालिका क्षेत्रात असतील".
No comments:
Post a Comment