शंभूराजु घराण्याचा हिरा हरपला; महाराष्ट्र गौरव भूषण शाहीर तुकारामबुवा माळी यांचे दुःखद निधन!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
संपुर्ण आयुष्यात कलेची उपासना करीत तमाशा, जाखडी नृत्य सारख्या लोककलेत आपला शाहिरी डंका गाजविणारे, गायन, लेखन, काव्य रचनेतून समाज प्रबोधन करणारे, पौराणिक व आध्यात्मिक यांचे गाढे अभ्यासक, मंडणगड तालुक्यातील पाले गावाचे ज्येष्ठ नागरिक, गावाचे सर्वेसर्वा, महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले शाहीर तुकाराम बुवा माळी यांचे दिनांक ३ मे २०२१ रोजी दुःखद निधन झाले. आपले संपुर्ण आयुष्य रसिक प्रेक्षकांची सेवा करताना पाले गावाचे नाव कलेच्या माध्यमातून सर्वदूर पसरविले, गाजविले. कित्येक वर्षे पाले गावाची धुरा, जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत यशस्वीपणे पार पाडली. काही दिवसांपासून ते आजारी होते. सात दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने दापोली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतील एवढे त्यांचे काम सर्वश्रुत आहे. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रावर, गावावर फार मोठा आघात झाला असून शोककळा पसरली आहे. कलेच्या तारांगणातील चंद्रमा आज हरपला असून त्यांच्या आठवणी मात्र कायम मनात राहणार आहेत. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशी भावपूर्ण श्रद्धांजली कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबई(रजि.) तर्फे वाहण्यात आली.
No comments:
Post a Comment