राज्यात दिवसभरात ५७ हजार ६४० नवे रुग्ण; ९२० रुग्णांचा मृत्यू !
'राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के'
मुंबई : देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात देखील रुग्णसंख्या वाढतानाच दिसत आहे. मंगळवारी राज्यात ३ आठवड्यांनी पहिल्यांदाच बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्त आढळून आली. मात्र, बुधवारी पुन्हा हे प्रमाण वाढलं असून बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे राज्यात दिवसभरात तब्बल ९२० करोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे.
दरम्यान, आज करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी आज दिवसभरात एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा एकूण आकडा ४१ लाख ६४ हजार ०९८ इतका झाला आहे. त्यासोबत राज्याचा रिकव्हरी रेट देखी ८५.३२ टक्क्यांवर आला आहे.
No comments:
Post a Comment