Wednesday, 5 May 2021

खासदार कपिल पाटील यांचा वादळ गारपिट ग्रस्त गावांचा पाहणी दौरा ! **नुकसानग्रस्तांना दिला मदतीचा हात **

खासदार कपिल पाटील यांचा वादळ गारपिट ग्रस्त गावांचा पाहणी दौरा !      
**नुकसानग्रस्तांना दिला मदतीचा हात **   


मुरबाड -(मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात रविवारी झालेल्या भिषण वादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या भागात आज भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटिल यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात दिला. तालुक्यातील लोत्याचीवाडी, अल्याचीवाडी, तसेच मेर्दी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये चक्रीवादळ व प्रंचड प्रमाणात गारपिट झाली होती. या गारपिटीने काही घरांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. घरातील अन्य-धान्य, सामानसुमानाची नासाडी झाली आहे. नुकसानग्रस्तांना मोरेश्वर हलोजी पाटिल ट्रस्ट व कपिल पाटिल फाऊंडेशन यांच्यामार्फत रु. १० हजारांची मदत करण्यात आली. यावेळी तहसिलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी रमेश अवचार, सभापती दिपक पवार ,  भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, जि. प. समाजकल्याण सभापती नंदा उघडा, जि.प.सदस्य सुभाष घरत, गोविंद भला, उपसभापती अरुणा खाकर, दिपक खाटेघरे, सुहास मोरे, अनिल घरत  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...