केद्रींय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे कल्याण ग्रामीण मध्ये पडसाद,' कोंबडी चोर'च्या घोषणा देऊन पोलिसांना निवेदन!!
कल्याण, (संजय कांबळे) : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना व शिवसेनेचे अंदोलन सुरू आहे.याचे तीव्र पडसाद कल्याण ग्रामीण भागात उमटले .कोंबडी चोर अशा घोषणा देऊन संतप्त शिवसैनिकांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या वर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मोदी सरकार मध्ये कोकणातील नारायण राणे यांचा केँद्रीय मंत्री म्हणून समावेश झाला आणि जनतेच्या प्रती आभार माणन्यासाठी भाजपाने जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले. या यात्रेच्या आयोजकावर साथनियत्रंण कायद्यानुसार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे भाजपाला कुठेतरी कमीपणा दाखण्यांचा प्रयत्न सुरू असतानाच काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने अंदोलन सुरू केले. कल्याण शहरात शिवसैनिकांनी भाजपाचे कार्यालय फोडले तर कल्याण ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी टिटवाळा येथील मंदिर परिसरातील चौकात नारायण राणे विरोधात घोषणा दिल्या, कोंबडी चोर, नारायण राणेचा निषेध असो अश्या घोषणा देऊन कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांना राणेवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment