राज्यात पावसाला ब्रेक ! पुढील काही दिवस हवामान कोरडे रहाण्याचा अंदाज !!
पुणे : राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानसह कोरडे हवामान होत आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून पूर्व आसामपर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे.
काल व आज सोमवारी (ता. २३) आत्तापर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस वातावरण राज्यात असेच राहणार तर कोकणात काही ठिकाणी उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
No comments:
Post a Comment