सहयाद्री कुणबी संघ, पुणे शहर तर्फे अनोखे रक्षाबंधन !!
मुंबई, (दिपक कारकर) :
भाऊ-बहिण नात्याच अतूट बंधन असणारा रक्षाबंधन सण नुकताच सर्वत्रित साजरा करण्यात आला. या दिवशी प्रतिवर्षी प्रमाणे पुण्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर ( रजि. ) संस्थेच्या तर्फे अग्निशमन दल एरंडना, पुणे येथील अनेकांच्या संकटमय काळात धावून येणाऱ्या सरकारी सेवेतील अग्निशमन दलातील जवानांसोबत सहयाद्री कुणबी संघाच्या पुणे शहर महिला आघाडी वतीने त्या जवानांना राखी बांधत रक्षाबंधन सणाचे ऋणानुबंध जपले. या उपक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पुणे शहर महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगन ( राज ) भागणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण भोज यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे विवीध स्तरांतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
Thank you so much ...ptrakar Dipakji karkar ......मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDelete