Monday, 6 September 2021

परिणामकारक बातमीदारी बद्दल पत्रकार संजय कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल तर्फे सत्कार !!

परिणामकारक बातमीदारी बद्दल पत्रकार संजय कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल तर्फे सत्कार !!


कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात  गेली कित्येक वर्षे सकारात्मक पत्रकारिता करणारे पत्रकार संजय कांबळे यांच्या परिणाम कारक पत्रकारिते बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल यांच्या तर्फे नुकताच टिटवाळा येथे सत्कार करण्यात आला.


टिटवाळा शहरा नजीक असलेल्या गुरवली येथील छोटे खाणी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेलार म्हणाले, कल्याण तालुक्याची जाण असणारे एकमेव पत्रकार म्हणून संजय कांबळे यांंचा क्रमांक खूपचं वरचा आहे, त्यांनी आतापर्यंत तालुक्यातील अनेक  अडचणी, समस्या, प्रश्न आपल्या पत्रकारितेतून मांडलेल्या आहेत. गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी, कातकरी, शेतकरी, कामगार, असे प्रश्न बातमीदारी तून प्रशासनापर्यंत पोहचवले आहेत, नुकतेच त्यांच्या पुढाकाराने गोवेली ठाकूरपाडा येथील आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी मिळाले. एवढंच नव्हे तर शहापूर आणि कल्याण तालुक्याच्या सिमेवर दोन्ही नदीच्या काठावर पवित्रा असे गंगा गोरेश्वर हे महादेवाचे तिर्थक्षेत्र आहे प्रत्येक महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी येथे भावाकांंची मोठी गर्दी होते. पण याकडे जाणारा रस्ता मात्र पुरता खड्ड्यात गेला होता. फळेगाव ते आबांर्जे ह्या रस्त्याची चाळण झाली होती. आम्ही देखील या रस्त्याने ये जा  करीत असतो, तसेच अनेक नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या रस्त्याने ये जा करतात .पण दुर्दैवाने हे खड्डे कोणाला ही दिसले नाहीत.


पण पत्रकार कांबळे यांनी या परिसरास भेट देऊन या रस्त्याचे सचित्र वृत विविध दैनिकातून प्रसिद्ध केले. आणि याचा इतका चांगला परिणाम झाला की आज गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे काम अखेर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरु झाले आहे. प्रांरभी मो-यांचे काम हाती घेतले असून तेथे मोठ मोठ्या सिंमेट पाईप टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून चा खड्यांचा वनवास परिसरातील नागरीकांचा आता संपणार आहे, हे सर्व पत्रकार संजय कांबळे यांच्या परिणाम कारक बातमीदारी मुळे शक्य झाले आहे. आणि यामुळे आम्ही आज त्यांचा सत्कार केला आहे असे शेलार म्हणाले.


तर सेवादल तालुका अध्यक्ष संजय मोरे यांनी ही पत्रकार संजय कांबळे यांचे अभिनंदन करून आम्ही देशाचे नेते शरद पवार यांच्या विचारानुसार समाजसेवा करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहेर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती व कल्याण पंचायत समितीचे सदस्य भरत गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली  सेवादल काम करीत आहे. व यामध्ये पत्रकार संजय कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मुळे तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्हांला मदत होणार आहे. कारण त्यांचे पोलीस, महसूल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत जिल्हा परिषद, आदी विभागाशी अंत्यत घनिष्ठ संबंध आहेत. याचा आम्हाला जनहितार्थ फायदा होणार आहे. असेही त्यांनी सांगितले. तर सत्काराला उत्तर देताना पत्रकार संजय कांबळे म्हणाले, माझी पत्रकारिता ही केवळ गोरगरीबांसाठी आहे, माझ्या बातमीमुळे नांगरीकांचे प्रश्न सुटतात, याचे मला समाधान वाटते .तसेच प्रशासन दखल घेतात. त्यांचेही आभार मानतो.

यांनतर कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रघूनाथ गायकर, सचिव विलास हरड, मनसेचे अश्विन भोईर, अँड मनोज सुरोशे, सुनील गायकर, कामेश पाटील, अक्षय कुंभार, कांबा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश बनकरी, समाजसेवक महेश देशमुख, आदींनी पत्रकार कांबळे यांचे अभिनंदन केले.

यावेळी युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस महेश दळवी, घोटसई गावचे ज्ञानेश्वर सुरोशे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...