Monday, 6 September 2021

कोकणी साज" युट्युब चॅनेल तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन !

कोकणी साज" युट्युब चॅनेल तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन !


चिपळूण : (दिपक कारकर) :

कोकणातील लोकप्रिय सण गणेशोत्सव अगदी मोजक्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे.सर्व गणेशभक्त कोकणात जाण्याच्या तयारीत सज्ज आहेत.या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे घरोघरी बाप्पांचे आगमन होते. हे दिवस अगदी भक्तिमय वातावरणात रंगुणच जातात. या सणाला बाप्पांच्या स्वागतार्ह मोठमोठ्या आकाराची सजावट, कलाकृती साकारल्या जातात. या कलाकृतींना वेगळं व्यासपीठ देण्यासाठी कोकण सुपूत्र प्रशांत पाडावे यांच्या कोकणी साज या युट्युब चॅनेल तर्फे गौरी-गणपती सणानिमित्त भव्य ऑनलाईन घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांक ₹ २२२२/ द्वितीय क्रमांक ₹ ११११ / व तृतीय क्रमांक ₹५५५ या स्वरूपातील बक्षिसे आहेत. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र ऑनलाईन देण्यात येईल. स्पर्धेच्या नियम/अटी तसेच सहभाग नोंदविण्यासाठी दिपक कारकर - ९९३०५८५१५३ / प्रशांत पाडावे - ९९२३६३००४२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...