आगामी पालिका निवडणुकीत भाजपाचीच सत्ता ! 'केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील'
'माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कामाचे केले कौतुक'
कल्याण, नारायण सुरोशे : राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता.
मात्र, ठाकरे सरकारने मागच्या दीड वर्षात मागच्या सरकारचे कामे पूर्ण करत, उद्घाटन करत असून नव्याने निधी न दिल्याने कल्याण पश्चिममधील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात केला
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांनी आमदार असताना कल्याणमधील उद्यानसाठी विशेष कोट्यवधी रुपयांचा निधी आणला होता. त्यातील एक लोकोपयोगी काम स्व. लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नरेंद्र पवार शशिकांत कांबळे, प्रेमनाथ म्हात्रे, वरूण पाटील, मोरेश्वर भोईर समवेत मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती.
भर पावसात उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पवार यांच्या कामाचे कौतुक करत पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र ठाकरे सरकारने मागील सरकारची कामे पूर्ण करत उद्घाटन केली.
हाच देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment