Monday, 6 September 2021

यंदा बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यांतून होणार का?.. रस्ते दुरुस्तीसाठी बाळकडू पत्रकार संघाने केला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार..

यंदा बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यांतून होणार का?..
रस्ते दुरुस्तीसाठी बाळकडू पत्रकार संघाने केला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार..


टिटवाळा, उमेश जाधव : कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सध्या स्थितीला अतिशय दयनिय झाली. या सर्व रस्त्यांची तात्काळ डागडुजी करून दुरूस्ती करण्याची मागणी बाळकडू पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने एका निवेदनाद्वारे कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाडे केली आहे. 


अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव. मात्र कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. यात मुख्य करून टिटवाळा जावईपाडा- रुंदे -फळेगांव -उशीद- काकडपाडा-गेरसे, निंबवली-राया-खडवली, वासुंद्री-कोंढेरी-सांगोडा, वासुंद्री-निंबवली, वासुंद्री- पिसा डॅम, खडवली-वावेघर, फळेगांव- मढ आदी रस्त्यांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. 


यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन‌ करावा लागत आहे. त्यातच तोंडावर येऊन ठेपलेल्या गौरी-गणपती सणाची लगबग सर्वत्र सुरु आहे. यामुळे नागरिकांना या खड्डेमय रस्त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बाप्पाचे आगमन याच खड्डेमय रस्त्यांतून होणार असल्याने गणेश भक्तांत नाराजीचा सूर निघत आहे. या बाबीची दखल बाळकडू पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी कल्याण उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला संघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष उमेश जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण सुरोशी, सचिन बुटाला व राष्ट्रीय सचिव विशाल वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. 

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...