डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेल्या काव्य संमेलनात अश्रूंचा फुटला बांध !!
"प्रिय भावास राज्यस्तरीय कविसंमेलन ठरले भावस्पर्शी"
शहापूर, (एस.एल.गुडेकर) :
डी. वाय. फाउंडेशन, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ, लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग ने जेष्ठ साहित्यीक, निर्भीड शिवव्याखाते दिवंगत डॉ दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या प्रिय भावास या कविसंमेलनात कवींसह रसिकांच्याही अश्रूंचा बांध फुटला, अनेकांनी डॉ दिलीप धानके यांच्या व अनेक दिवंगत भावांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले, डॉ. दिलीप धानके यांच्याबद्दल कविता व प्रास्तविक सादर करताना महेश धानके यांची भावाप्रति श्रद्धा पाहून तर सारेच संमेलन भावव्याकुळ झाले, किल्ले माहुलीच्या कुशीत माजी सभापती गजानन गोरे यांच्या फार्म हाऊसवर हे भावस्पर्शी व अविस्मरणीय असे राज्यस्तरीय कवि संमेलन पार पडले,
डि.वाय.फाउंडेशन चे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या शुभ हस्ते प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ आलेल्या अनुक्रमे सुनील म्हसकर, सागरराजे निंबाळकर, देवभाऊ उबाळे, प्रसाद फर्डे, सुरेखा गायकवाड, वसंत हिरे याना सन्मान चिन्ह, मानपत्र, ज्ञानेश्वरी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, यावेळी शहापूर - मुरबाड रहिवासी संघाचे अध्यक्ष किसन बोन्द्रे, कल्याण तालुका काँग्रेस अध्यक्ष परशुराम पितांबरे, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे संचालक विनायक सापळे, प्रहार चे तालुका कार्याध्यक्ष धनंजय धसाडे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे, वैशाखरे येथील माजी सरपंच विलास घरत, आदर्श सरपंच चंदू कापडी, डॉ. दिलीप धानके यांचे जेष्ठ पुत्र रोहन धानके, देवेन्द्र भेरे, किरण केणे, चिंतामण वेखंडे, जयवंत विषे आदी मान्यवर उपस्थित होते, परीक्षक म्हणून जेष्ठ कवी केशव शेलवले तर युवा कवी प्रकाश फर्डे यांनी काम पाहिले, संमेलनात ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक आणि पुणे येथील मान्यवर कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या, सूत्रसंचालन भास्कर जाधव, धनश्री पाठारी, वैशाली घरत यांनी केले तर संमेलन यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण घरत, रवींद्र परटोले, रामचंद्र जोशी, अंकुश भोईर, सिद्धार्थ धानके, रवींद्र जाधव, अविनाश वाकचौरे, तेजस रोकडे, मुकेश विशे, आशुतोष घरत, यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment