*शिक्षक दिन*
*- संत राजिन्दर सिंह जी महाराज*
आजचा दिवस आपण सर्वजण 'शिक्षक दिन' किंवा 'टीचर्स डे' च्या रूपात साजरा करतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांचा आणि गुरुजनांचा सन्मान करतो. काही शिष्य या प्रसंगी आपल्या शिक्षकांकरिता विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन जातात, कोणी शुभेच्छा पत्र घेऊन जातात, तर कोणी काही अन्य भेटवस्तूही नेतात. अशा प्रकारे ते त्यांच्या विषयी आपली श्रद्धा आणि आभार प्रकट करतात.
या संसारात जेव्हा कधी आपल्या मुलांना एखादा विषय शिकायचा असेल तेव्हा, ते अशा शिक्षकांकडे जातात जे त्या विषयात निपुण आहेत. आपण हे सर्व चांगल्या प्रकारे जाणून आहोत की शिक्षकांची मुलांच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं केवळ लिहिणे वाचणे शिकत नाहीत, तर भविष्यात मोठे होऊन त्यांना काय बनायचे आहे याची माहिती सुद्धा त्यांना शिक्षकांद्वारेच मिळते.
अशाच पकारे जर आपण स्वतःला अध्यात्मिक रूपाने सुद्धा विकसित करू इच्छित असू, तर त्याकरिता आपल्याला कोणत्या विद्यमान पूर्ण सद्गुरूंच्या चरण-कमळी जावे लागेल. कारण एक पूर्ण सद्गुरु अध्यात्माच्या विषयात निपुण असतात. या धरतीवर प्रत्येक समयी कोणी ना कोणी पूर्ण सद्गुरु अवश्य अस्तित्वात असतात. जे आपणास ध्यान-अभ्यासा द्वारे आपल्या अंतरी अस्तित्वात असणाऱ्या प्रभु सत्तेशी जोडण्याकरिता आपली मदत करतात. प्रभुसत्ता कोणत्या ना कोणत्या मानवी शरीराच्या माध्यमातून अवश्य कार्य करत असते.
जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो तेव्हा आपणास माहीत होते की, चौर्यांशी लाख योनी मध्ये केवळ मानवदेहातच आपण आपल्या आत्म्याचे मिलन प्रभुशी करू शकतो, जो मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आहे. ते आपल्याला समजावतात की, पिता परमेश्वर प्रेमाचे महासागर आहेत. आपला आत्मा त्यांचा अंश असल्याकारणाने प्रेम आहे आणि पिता परमेश्वराला प्राप्त करण्याचे माध्यम प्रेमच आहे.
शिक्षकांमध्ये शिष्याच्या जीवनात बदल घडवण्याची शक्ती असते. जर शिक्षक अशा विद्यार्थ्यांना शिकवत असतील ज्यांच्यात सदाचाराची कमी आहे तर ते त्यांना हळूहळू सदाचारी व्यक्तीमध्ये परिवर्तीत करतात. हेच काम एक सद्गुरु करतात, ते काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार ग्रस्त दुःखी लोकांना जवळ करतात आणि त्यांचे अशा माणसात परिवर्तन करतात की जे अहिंसा, पवित्रता, नम्रता, सत्य, निस्वार्थसेवा आणि प्रेमपूर्ण असतात. ते असं कसे करू शकतात? ते हे सर्व प्रभु प्रेमाच्या शक्तीने करू शकतात.
तें केवळ आंतरिक अनुभव प्राप्तीच्या विधी विषयीच समजावित नाहीत तर ते प्रत्यक्ष त्याची अनुभूती सुद्धा देतात. कारण की केवळ बोलण्याने किंवा वाचनाने आपण अध्यात्म शिकू शकत नाही. हे केवळ व्यक्तिगत अनुभवानेच शिकता येते. आणि तो अनुभव केवळ पूर्ण सद्गुरु प्रदान करू शकतात.
याकरिता आपल्याला एखाद्या पूर्ण गुरूंना शरण गेले पाहिजे. जेव्हा ते आपल्याला दीक्षा अथवा नामदान देतात तेव्हा ते आपल्याला ध्यान-अभ्यासाची विधि शिकवितात. ते आपल्याला सांगतात की आपण आपले ध्यान दोन डोळ्यांच्या भ्रुमध्या मध्ये एकाग्र करावे ज्याला शिवनेत्र सुद्धा म्हटले जाते. जस-जसे आपण ध्यानाभ्यासाला वेळ देतो तस-तसे आपण आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योती आणि श्रुतीचा अनुभव करतो, ज्यामुळे आपल्या जीवनात एक परिवर्तन येते. आपण आपल्या अंतरी शांति आणि प्रेमाला अनुभवतो.
ज्याप्रकारे एका शिक्षकाचे कार्य मुलांना शिक्षणाद्वारे त्यांच्या इच्छेनुसार दुनियावी उद्देशाप्रति पोहोचविणे आहे. ठीक अशाचप्रकारे एक सद्गुरु सुद्धा प्रेमाच्या माध्यमातून पिता परमेश्वरापासून वेगळ्या झालेल्या आत्म्यांना त्यांच्या निजधामी सच खंडात पोहोचवितात.
चला तर! आजच्या दिनी न केवळ अध्यापकांचा सन्मान करूया परंतु आपल्या अध्यात्मिक गुरुंप्रती सुद्धा कृतज्ञता प्रकट करूया, कारण की त्यांच्याद्वारे च आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन पिता परमेश्वरात लीन होऊ शकतो. अशा पूर्ण सद्गुरूंना कोटी कोटी वंदन !
सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2
अमृता : +91 84510 93275
No comments:
Post a Comment