Saturday, 4 September 2021

आदर्श शिक्षक पुरस्काराला "अश्लील," आरोपाचे 'प्रमाणपत्र? त्या शिक्षकांकडून समाजासमोर कोणता, 'आदर्श'?

आदर्श शिक्षक पुरस्काराला "अश्लील," आरोपाचे 'प्रमाणपत्र? त्या शिक्षकांकडून समाजासमोर कोणता, 'आदर्श'?


कल्याण, (संजय कांबळे) : पुर्वी शिक्षक हे समाजाचे, गावाचे एकमेव, आदर्श'असायचे, पण हल्ली स्वतःला आदर्श म्हणून घेण्यासाठी डझनभर शिफारशी, अनेक तडजोडी, हुजरेगिरी करावी लागते, असाच काहीसा प्रकार यंदाच्या, आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने समोर आला असून विद्यार्थ्यांनीशी' अश्लील'चाळे करणाऱ्या शिक्षकाची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर दुसरीकडे 'मला' पुरस्कार मिळाला नाही तर हा कार्यक्रमच उधळून लावू असा इशारा एका शिक्षिकेने दिल्याने अशा 'मास्तरां'कडून समाजाने काय आदर्श घ्यावा असा प्रश्न उपस्थित केला जात असून यानंतरही या शिक्षकाला 'आदर्श'शिक्षक पुरस्कार देण्यात आल्यास त्याचा निषेध करून अंदोलन करु असा गर्भित इशारा मुरबाड चे भगवान पवार यांनी दिला आहे.


कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्षे शिक्षकांचा मानाचा असा 'आदर्श शिक्षक, पुरस्कार सोहळा झाला नव्हता. परंतु आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने व लाॅकडाऊणचे निर्बंध शिथील केल्याने या वर्षी ५ संप्टेंबर या शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील जिप शाळा खापरी यथील तत्कालीन शिक्षक अंनता केदार यांना ही पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु या शिक्षकाने येथील एका विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केले होते, यानंतर ग्रामस्थांनी यांच्या विरोधात अंदोलन केल्याने याची तक्रारी बदली कल्याण तालुक्यातील म्हसकळ जिप शाळा येथे करण्यात आली होती. तसेच या तक्रारीची चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकारी भारती व विस्तार अधिकारी अतरगे मँडम गेल्या होत्या. त्यामुळे अशा नैतिकता गमावलेल्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊ नये अशी लेखी तक्रार रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे सहसचिव भगवान पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-याकडे केली आहे, तसेच तक्रारी नंतरही प्रशासनाने पुरस्कार दिल्यास याचा निषेध करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारही देण्यात आला आहे.


तर दुसरीकडे कल्याण तालुक्यातील एका शिक्षकेच्या अनेक तक्रारी असल्याने तसचे गुणांकामध्ये त्या बसत नसल्याने त्यांना पुरस्कार नाकारला आहे. त्यामुळे त्यांनी चक्क पुरस्कार सोहळा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज होणा-या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला "बिचाऱ्या," कल्याण गटशिक्षणाधिका-यांना पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो आहे. कसला हा आदर्श?

वास्तविक पाहता अंनता केदार यांच्या विरोधातील तक्रारी नंतर शिक्षणविभागाने त्यांचे सर्विस बुक तपासले यामध्ये कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह नोंद नसल्याने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु हे प्रकरण वेळीच रफादफा केल्याने तक्रार नोंदवली नाही, तसेच यात काही तथ्य नसते तर शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी चौकशी साठी कसे काय आले?त्यामुळे नैतिकता म्हणून तरी या शिक्षकाने पुरस्कार स्विकारु नये असे अवाहन भगवान पवार यांनी केले आहे.

दरम्यान कल्याण तालुक्यातील सन २०२१/२२ वर्षासाठी १६ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर मुरबाड तालुक्यातील या दोन वर्षासाठी २२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोना मुळे हा कार्यक्रम सलग दोन वर्षे रखडला होता. तब्बल दोन वर्षानंतर हा सोहळा संपन्न होत आहे. परंतु आता ही या सोहळ्यास अश्लील आरोपाचे, वादाचे, इशाऱ्याचे, अंदोलनाचे ग्रहण लागल्याने विद्यार्थ्यांनी, समाजाने यांचेकडून काय व कोणता" आदर्श" घ्यावा हे मोठे कोडेच आहे.

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...