*_प्रेमळ आणि मन मिळावू स्वभावाच्या मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप ( जनो पाटलीन ) यांचे वृद्धापकाळाने निधन_*
*भुईबावडा* :
वैभववाडी तालुक्यातील आखवणे गावच्या ज्येष्ठ रहिवाशी स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप ( जनो पाटलीन ) यांचे मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या 124 व्या वषीॅ वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप यांच्या निधनाने जुन्या पीढीतील एका पर्वाचा अंत झाला आहे.
आखवणे, नागपवाडी, भोम गाव एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीमत्वास मुकला आहे.
स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप या प्रेमळ, नम्र, साध्या, सरळ, मनमिळावू ,परोपकारी स्वभावाच्या होत्या.
आयुष्यभर त्यांनी आपल्या स्वभावाने जीवा भावाची माणसं जपली.
आखवणे,नागपवाडी,भोम आणि परीसरात स्व.मातोश्री सिताबाई रामचंद्र नागप या जनो पाटलीन या नावानेच ओळखल्या जात होत्या.
लोक आदराने त्यांना जनो पाटलीन म्हणुनच संबोधीत असतं.
स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप (जनो पाटलीन) यांच्या पश्चात सुन,तसेच नातवंडे गणेश नागप, रामदास नागप, अरुण गुडेकर (नातवंडं) वासुदेव राणे, अजय माळकर, सुरेश पालांडे, (नातं जावंई) असा मोठा परीवार आहे.
स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप (जनो पाटलीन) यांच्या पवित्र स्मृतिस आखवणे, नागपवाडी, भोम अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.
No comments:
Post a Comment