प्रेरणा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत पत्रकार /संपादक यांच्या ऑनलाईन सन्मान सोहळ्याचे बुधवारी आयोजन !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
प्रेरणा फाउंडेशन (रजि.564/एफ 38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र) या सामाजिक संस्थेतर्फे कोरोना लॉकडाऊन च्या काळात ज्या पत्रकारांनी /संपादक मान्यवरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता "माझा समाज माझी जबाबदारी" या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपले कार्य योग्य रीतीने पार पाडले. तसेच प्रेरणा फौंडेशनच्या कार्याची वेळोवेळी दखल घेतली आहे अशा सर्व पत्रकारांना ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१" या पुरस्काराने बुधवार दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५ वा. सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर (पत्रकार उत्कर्ष समिती), अविनाश म्हात्रे (कार्यकारी अध्यक्ष, पत्रकार उत्कर्ष समिती), गणेश हिरवे, बाळासाहेब भालेराव (अध्यक्ष, ऑल सुपर स्टॉल सोशल मीडिया पत्रकार संघटना), राजू टपाल (संपादक, टिटवाळा न्यूज चॅनल), शैलेश सणस (कार्यकारी संपादक, आदर्श रायगड), दीपक शेळके ( संपादक, युवा आदर्श), डॉ. वैभव पाटील, पल्लवी सतीश शिंदे (कार्यकारी संपादिका विश्व विद्या), मछिंद्र कांबळी, श्रीकांत दत्ताराम म्हात्रे (संपादक, सत्यकामना), पंकजकुमार पाटील (संपादक पा.आदर्श वार्ताहर), लक्ष्मण चा. पवार (दैनिक अंबरनाथ न्यूज, दैनिक लोकन्यूज, लोकमंथन), दिनेश तर्फे, सुरेंद्र मिश्रा, तुलसीदास नाईक, शांताराम गुडेकर (पत्रकार- दै.रत्नागिरी टाइम्स), निसार अली सय्यद, राजेश पंड्या, नीलकंठ साने (दैनिक साम्राज्य पोलादपूर प्रतिनिधी), मोहिनी जाधव, अजय जोशी, लक्ष्मण राजे, अशोक उगले, राजेंद्र घरत (उपसंपादक दै. आपलं नवे शहर), अमीत जाधव, अमोल सांगळे, आत्माराम नाटेकर, (पत्रकार- लोकसत्ता) प्रशांत जोशी, अरविंद म्हात्रे, जैतु मूठोळकर, उमाकांत आरोलकर, प्रमोद दळवी (संपादक दै.जिल्हा टाइम्स), तानाजीराजे जाधव, रमेश घरत (ठाणे वैभव), रफिक घाची, भगवान निकम (लोकांनद, कृष्णनीती), विलासराव कोळेकर (कार्यकारी संपादक, ईगल न्यूज चॅनल), आरती पाटील (उप संपादक आवाज कोकणचा) आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमचे प्रसारण प्रेरणा प्रोडक्शन चॅनल महाराष्ट्रच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रेरणा फाउंडेशन (संस्थापिका/अध्यक्षा) दिप्ती (प्रेरणा) गांवकर व प्रेरणा फाऊंडेशन कमिटीने सांगितले.
No comments:
Post a Comment