सरळगाव येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न !!
**सत्तेसाठी शिवसेनेने कंबर कसली, मोठ्या संख्येने पदनियुक्त्यानी मोर्चे बांधणीला सुरुवात **
मुरबाड, (मंगल डोंगरे) : नुकताच ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत मुरबाड तालुक्यातील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेकडो शिवसैनिकांची नियुक्ती पत्र देवुन पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली. सदरचे नियुक्ती पत्र प्रकाश पाटील, जि.प.अध्यक्षा पुष्पाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यांत आले. यावेळी शेकडो शिवसैनिकांना पदभार देण्यात आला.
बाळासाहेबांची शिवसेना हि शिस्त, वचन सेवा आणि नाते जपणारी 80℅ समाजकारण व 20℅ राजकारण अशी संघटना असुन, सत्ता हे कार्यकर्त्याचा श्वास आहे. सत्तेशिवाय सेवा आणि विकास नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी ग्राम पंचायत चा सरपंच, पंचायत समितीचा सभापती, नगरपंचायतीचा नगराध्यक्ष, जि.प. चा अध्यक्ष तसाच तालुक्याचा विकास साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी भगवा फडकविला पाहिजे. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसैनिकांनी जिंकल्या पाहिजेत. एकेकाळी मुरबाड तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी मध्ये चुरस व्हायची पण आता राष्ट्रवादीची सर्व मंडळी सुभाष पवार यांच्या रूपाने शिवसेनामय झाली असुन, भविष्यात संपूर्ण मुरबाड तालुका भगवामय केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाहीत. असे सुतोवाच प्रकाश पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. गेल्या दोन वर्षापूर्वी तालुक्यात राजकीय भुकंप झाला. आणि गोटीराम पवार यांची राष्ट्रवादी सेनेत दाखल झाली. दरम्यान झालेल्या निवडणुकीत त्यांनी. पक्षाच्या आदेशानुसार काम केले. परंतु पद किंवा जबाबदारी नसल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल, कुठल्याही प्रकारची जबाबदारी घ्यावयास धजावत नव्हते आणि म्हणूनच या संपूर्ण राष्ट्रवादीच्या सैनिकांना तालुका, जि.प.गट. पं स.गणानुसार पदे वाटप करण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, आपण जुने, नवे शिवसैनिक कसे सांभाळाल, असे विचारले असता, नवीन सुनबाई जसे हळूहळू माहेर विसरते, तसे भुतकाळीचे राष्ट्रवादीने विसरून बाळासाहेबांचे सैनिक म्हणून काम करत राहायचे. निष्ठेने कामे केल्यास पद मागण्याची वेळ येत नाही. मी शाखाप्रमुखापासून आता जिल्हाप्रमुखा पर्यंत कधीही पद मागितले नाही. माझे काम आणि जबाबदारी ओळखुन स्वतःला फक्त बाळासाहेबांचा सैनिक म्हणून पाहतो. मी निष्ठेने केलेल्या कामाची पोहोच पावती मला मिळाली आहे. त्याचा उपयोग मी शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांच्या न्याय हक्कासाठी करत आहे. आपल्याला आपला विकास हवा असेल, तर आपणही स्वतःला फक्त बाळासाहेबांचा सैनिक म्हणून पहा आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय तुमची किंमत वाढणार नाही. पद येतात जातात. त्यावर नाराज होण्याची आवश्यकता नाही. आगामी मुरबाड नगरपंचायत नाही निवडणुकी मध्ये शिवसेना सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर आपण भगवा फडकविल्या शिवाय राहणार नाहीत. असे बोलून श्री. पाटील यांनी शिवसैनिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील. जि.प. अध्यक्षा पुष्पाताई पाटील, युवासेनेचे प्रभूदास पाटील, जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवार, क्षेत्र संघटक आप्पा घुडे, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, जि.प. सदस्यां रेखाताई कंटे, प्राजक्ता भावार्थ, जिल्हा संघटक उर्मिला लाटे, पं.स.सदस्या पद्माताई पवार, रामभाऊ दळवी, बाळा चौधरी, पांडुरंग धुमाळ,शहर प्रमुख रामभाऊ दूधाळे, प्रशांत मोरे, पंकज दलाल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment