Sunday, 5 September 2021

शिक्षकांचे प्रतिबिंब हे विद्यार्थ्यांत दिसते,शिक्षक गुणवंत असेल तरच उद्याचे विद्यार्थी घडतील - केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील.

शिक्षकांचे प्रतिबिंब हे विद्यार्थ्यांत दिसते,शिक्षक गुणवंत असेल तरच उद्याचे विद्यार्थी घडतील - केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील. 


मुरबाड, (मंगल डोंगरे) : शिक्षकाचे प्रतिबिंब हे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. जर शिक्षक गुणवंत असेल थरच उद्याचे विद्यार्थी घडतील. असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड कुणबी समाज हाँल येथील शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळा येथील कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना केले.


[[  ** *मुरबाड पंचायत समिती  शिक्षण विभागाचे अनागोंदी कारभारामुळे महिला शिक्षिकेला 33 वर्षाचे सेवेनंतर पुरस्कार. तर आगरी समाजातील शिक्षकांना हेतुपुरस्सर पणे पुरस्कार प्रक्रियेतुन डावलण्यात आल्याने आगरी समाज बांधवांनी केला काळ्या फिती लावून निषेध.**]]

मुरबाड तालुक्यातील शिक्षण विभागाचे अनागोंदी कारभारामुळे एका महिला शिक्षिकेला तालुका पुरस्कारासाठी तब्बल 33 वर्षे सेवा केल्या नंतर शिक्षक दिनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले .तर या पुरस्काराचे प्रक्रियेत आगरी समाजाला प्राधान्य न दिल्याने संतप्त आगरी समाजातील शिक्षकांनी मंत्री कपिल पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे कारभाराचा तिव्र निषेध व्यक्त केल्याने शिक्षण विभागाचे कारभारा बाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरबाड पंचायत समितीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सन 2019-20 मधिल शिक्षकांच्या 34 फाईल मागविण्यात आल्या त्यातून त्यांनी 11 शिक्षकांची निवड केली व 2020-21 साठी 15 फाईल मागविण्यात आल्या त्यापैकी 11 अशा 22 शिक्षकांना तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी मुरबाडच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्र्यांचे हस्ते हे पुरस्कार वितरित होत होते. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सभापती दिपक पवार, उपसभापती स्नेहा धनगर, पं.स. सदस्या पद्माताई पवार, अनिल देसले. तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पुरस्कार प्राप्त शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचे नेतृत्व करणारे खासदार कपिल पाटील यांना केंद्रात मंत्री पद मिळाल्याने तमाम आगरी समाजाचे बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र प्रथमच केंद्रीय मंत्र्यांचे हस्ते पुरस्कार प्रदान होत असताना मुरबाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.व्ही. लंबाते यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत आगरी समाजाचे शिक्षकांनी भरसभेत काळ्या फिती लावून या सोहळ्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. तर माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी देखील मुरबाड सारख्या ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे गट शिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारी गट शिक्षणाधिकारी हे कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला आलेली मरगळ हटविण्यासाठी लवकरात लवकर मुरबाड मध्ये रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांचे पद भरुन तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला बळ द्या अशी विनंती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचेकडे केली. या प्रसंगी कपिल पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले की शिक्षकांचे प्रतिबिंब हे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेत दिसते. त्यामुळे शिक्षक हा जर गुणवंत असेल तरच उद्याचे विद्यार्थी घडतील .

 ..... जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की सालाबादप्रमाणे शिक्षण विभाग शिक्षकांचा केवळ सन्मान पत्र देऊन गौरव करते. तर यापुढे शिक्षकांना पुरस्कारात रोख रक्कम देण्यासाठी विशेष तरतूद केली जाईल. असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...