चोपडा प्रकल्प 2.. अंगणवाडी चे मोबाईल वापस करनार !!
भंगार मोबाईल वापरण्याची कार्यालयीन धमकी व सक्तीचा निषेध!!
चोपडा, बातमीदार: महाराष्ट्र शासनाचे तर्फे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले पनसोनीक कंपनीचे मोबाईल वॉरंटी गॅरंटी संपलेले असून ते तापतात तसेच ते नादुरुस्त झाले तर त्याचे पार्टस मिळत नाहीत, दुरुस्ती खर्च अव्वाचा सव्वा असून तो दुरुस्त खर्च कार्यालयाकडून मिळत नाही, रिचार्ज सुद्धा वेळेवर मिळत नाही या मोबाईलची मेमरी अत्यंत कमी असून हे हँग होतात डाउनलोड लवकर होत नाही. फार वेळ जातो या बाबींना कंटाळून महाराष्ट्रातील ७ संघटनांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने गेल्या दोन महिन्यात अंगणवाड्यांचे *मोबाईल फोन वापस आंदोलन* सुरू केले आहे हे आंदोलन जळगाव जिल्ह्यातील सुरू आहे. नवीन मोबाईल मिळावेत मुख्य मागणी आहे. पण जिल्ह्यात *मोबाईल वापसी आंदोलन* सुरू केले आहे. जमा केलेले मोबाईल सेविकांनी परत न्यावेत म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेवीका उलटसुलट धमक्या देणे, न दिलेल्या नोटिसाची उत्तरे द्या नाहीतर मोबाईल न्या..!
मोबाईल नेला नाही तर तुमचा पगार होणार नाही अशा उलट सुलट मोबाईल वर मॅसेज पाठवून सेविकांना अक्षरशः अंगणवाडी सेविकांना घाबरवून व भंडावून सोडले आहे त्यात काही सेविकांनी मोबाईल परत नेले या कार्यालयीन अधिकारी यांचा अशा प्रकारचा खराब मोबाईलवर काम करण्याची सक्ती. व मोबाईल नेणेस भाग पाडणेसाठी चालवलेल्या "बेकायदेशीर धमक्यांचा" निषेध जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आय टकने केला आहे. संघटनेने जाहीर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की अशा प्रकारांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. असे सांगून पुढे म्हटले आहे की कार्यालयाने अशा प्रकारचे धाक दडपशाही करण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांची नवीन मोबाईलची मागणी व सध्याचे मोबाईल वापरण्यात येत असलेल्या अडचणी याबाबत शासनाला माहिती पाठवावी व नवीन मोबाईल मिळवून द्यावेत अशी मागणी युनियनच्या जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांनी केले आहे पुढे म्हटले आहे की ,कामाचा पर्याय म्हणून उपलब्ध स्टेशनरी वर कामाची नोंद करीत आहेत अशी मागणी युनियनच्या जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांनी केले आहे. वारंटी गॅरेंटी संपलेले मोबाईल आयटक युनियन सभासद संपूर्ण परत करतील तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलेला आहे त्याची सुरुवात काल रोजी *अडावद येथे मोबाईल वापसीचे सुरवातीने करण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्या जिजाबाई महाजन, भारती पाटील, शारदा नाईक, प्रतिभा महाजन, विभावरी पुराणिक, देशमुख, वैशाली पाटील, नलिनी सूर्यवंशी, आशा महाजन. गुप्त्यारी तडवी, शीतल महाजन आदी हजर होते.


No comments:
Post a Comment