Sunday, 24 October 2021

सक्तीने वीजबिल वसूल करणाऱ्या विद्यूत मंडळा चुकीने झालेल्या नुकसानीची भरपाई देतांना मात्र यांच्या हाताला, 'लकवा?

सक्तीने वीजबिल वसूल करणाऱ्या विद्यूत मंडळा चुकीने झालेल्या नुकसानीची भरपाई देतांना मात्र यांच्या हाताला, 'लकवा?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोना, अतिवृष्टी, पुर, चक्री वादळ आदी नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून कसेबसे सावर असताना आता विद्यूत वितरण कंपनी ने सगळीकडे सक्तीने विजबील वसूली मोहीम सुरू केली आहे. प्रंसगी लाईट कट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. परंतु याच अतिशहाण्या लोकांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे,नागरीकांचे अपरिचित नुकसान होते व जेव्हा त्यांना मदत देण्याची वेळ येते तेव्हा मात्र यांच्या हाताला "लकवा" मारतो हे जळजळीत सत्य विविध घटनामधून समोर येत आहे .


कोरोनाचे संकट कसेतरी कमी होत असतानाच, अतिवृष्टी, पुर आणि चक्री वादळ यामुळे जनता अक्षरशः वैतागून गेली आहे सतत वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, तेल डाळी, भाजीपाला यांच्या किंमत गगणाला भिडलेल्या या सर्वामुळे नागरिक भयंकर तणावाचे जीवन जगत आहेत. या संकटातून कसेबसे सावरत असताना विज वितरण कंपनीने सक्तीने वीजबिल वसुली सुरू केली आहे. म्हणे ५०० रुपये थकबाकी असेल तरी लाईट कापण्याचे आदेश ऐसीत बसणाऱ्यानी दिले आहेत. पोटाला चिमटा घेऊन गोरगरीब कसेतरी इमानेइतबारे बील भरत आहेत. यांचे एखादे बील थकले तर विद्यूत कर्मचारी 'यमराज' प्रमाणे दारात उभे राहतात. गयावया, अर्ज, विंंनत्या, पायदळी तूडवून लाईट कापली जाते,


तर दुसरीकडे आकडे टाकणारे, फार्महाऊसवाले, विविध चँयनिज गाड्या, आदी मंडळी अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बिनधास्त चोरीची लाईट वापरतात. आजही अनेक गावात तारेवर आकडे लटकताना दिसतात, हे विद्यूत कर्मचाऱ्यांना माहिती नाही का? तर आपण आकडे टाकणा-या लोकांची नावे विद्यूत कंपनीला कळवली तरीही अद्याप त्यांचे काही वाकडे झाले नाही, असे एका जागृत नागरीकांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर या लोकांशी हातमिळवणी करून टिटवाळा जवळील धाब्यावर पँक वर पँक रिचवून,गावठी कोंबडा, कलेजी टेटा, मच्छीफ्राय वर येथेच्छ ताव मारणारे, अशा विजचोरावर काय कारवाई करणार? असा सवाल एका सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.

तर ज्या तत्परतेने एसीत बसणारे, मंत्री व अधिकारी वीजबिल वसूलीचे आदेश काढतात, ते त्यांच्या च अक्षम्य चुकीमुळे शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या, पोटच्या पोराप्रमाणे सांंभाळलेल्या प्राण्यांचा जीव जातो, पिक जळून खाक होते, नांगरीकाचा जीव जातो, अशांना नुकसानभरपाई देतांना यांच्या हाताला सर्पदंश होतो का?अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करतात,

टिटवाळा जवळील उशीद गावचे शेतकरी परशुराम आंबो भागरे वय ६० वर्षे यांची अत्यंत लाडकी "काळू" ही म्हैश तुटलेल्या विजेच्या तारेचा शाँक लागून जागेवर मेली. या शेतकऱ्यांला ही घटना समजताच त्यांने कित्येक दिवस अन्न त्याग केला होता, ही घटना ९ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती, विद्यूत कंपनीच्या मेहरबान साहेबांनी पंचनाम्याचा सोपस्कार उरकला, मात्र दिड दोन वर्षे व्हायला अली परंतु अद्याप ही एक" दिडकी" या शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळाली नाही. अशी काही एकच घटना नाही, सापाड, कांबा, बांधण्याचा पाडा येथे शेतकऱ्यांचे बैल, म्हशी, आदीवासीच्या बक-या, अशा कितीतरी घटना घडल्या आहेत. पण यातील किती शेतकऱ्यांना, नागरिकांना, नुकसान भरपाई मिळाली हा पिएचडीचा विषय ठरू शकतो?

त्यामुळे आपण नागरिक व पिचलेल्या शेतकऱ्यांशी कसे वागतो? मग त्या बदल्यात नागरीकांंनी तूमच्याशी कसे वागायला हवे याचे आत्मपरीक्षण करायला हवे,

सध्या ग्रामीण भागात लाईटचा खेळखंडोबा सुरू आहेच, अनेक पोल सडलेले गंजलेले आहेत, तारा जमीनीवर झोका घेत आहेत,काही ठिकाणी लोंबकळत असलेल्या तारा मुळे लाईटचे पोल वयोवृद्धाप्रमाणे कंबरेत वाकलेले आहेत, तर दाट लोकवस्ती मध्ये हे पोल जळू प्रमाणे गुरफटलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत विजबील वसूली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून शेतकरी व नागरिक यांच्या कलाने वसुली करावी, हिटलर शाही वृत्ती चा वापर केला तर ते केव्हाही, विध्वंसक, त्रासदायक, ठरणारच, याचा विचार व्हायला हवा.

गोरगरीब, कष्टकरी, दलित, आदिवासी, मजूर, शेतमजूर, नागरिक, शेतकरी यांच्या वर सतत काही ना काही आस्मानी संकटे येत आहेत, वाढत महागाई, पुर, अतिवृष्टी, चक्रीवादळे यामुळे तो पुरता खचला, पिचला आहे, अशा संकटाच्या वेळी आपण जर त्यांच्या वर काही "सवलती" ची फुंकर घातली तर तो नव्या जोमाने, उमेदीने, पुन्हा उभा राहील,व आपला एक रुपया देखील थकीत ठेणार नाही, कारण तो सर्वाचा पोशिंदा आहे, त्यामुळे त्यांना आपल्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील त्याच आत्मियतेने द्यावी.

प्रतिक्रिया* -माझ्या लहान मुले नातवंडे यांचा सांभाळ मी माझ्या लाडक्या म्हैशीच्या जिवावर केला, मात्र लाईटने तिचा घात केला, एक दिड वर्षे होत आली, पण अद्यापही काही मिळाले नाही' -परशुराम भागरे (शेतकरी, उशीद, टिटवाळा)

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...