Saturday, 23 October 2021

महिला व बालविकास विभागाच्या वतीने 'जांभूळ' गावातील पासष्ट एकर जमिनीचा होणार कायापालट 'इंडोको कंपनी व ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग !

महिला व बालविकास विभागाच्या वतीने 'जांभूळ' गावातील पासष्ट एकर जमिनीचा होणार कायापालट 'इंडोको कंपनी व ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग !!


कल्याण, (संजय कांबळे) : समाजात वाढत असलेल्या भिक्षेकरी प्रथेस आळा घालून त्यांना स्वतः च्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवणे यासाठी शासनाने अशा लोकांच्या पुनर्वसनासाठी कल्याण तालुक्यातील जांभूळ या गावी सुमारे ६५ एकर जमिन दिलेली होती. परंतु निधी अभावी ती पडिक होती. पण आता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने या जमिनीचा कायापालट होणार असून त्याची सुरुवात आज वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी इडोको रेमडिल्स लि. आणि ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी ठाणे यांच्या नियंत्रणाखाली मुंबई भिक्षूकरी प्रतिबंध अधिनियम १९५८ नुसार कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे १९६० साली शासकीय पुरुष भिक्षूकरी ग्रह या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामागील उद्देश होता की समाजात वाढत चाललेल्या भिक्षेकरी प्रथेस आळा घालणे, भिक्षा मागण्याची सवय असलेल्या व्यक्तींना स्थानबद्ध करणे, त्यांना कष्टाची सवय लावणे, शेतीविषयक कामांचे शिक्षण देणे, स्वावलंबनाचे धडे देऊन त्यांना स्वतः च्या पायावर उभे करणे. आदी चा समावेश होता. यांच्या पुनर्वसनाकरिता जांभूळ गावातील सुमारे ६५ एकर जमीन देण्यात आली. यामध्ये शासकीय भिक्षूकरी पुरुष गृह संस्थेची १०० ची मान्यता मिळाली असून आजमितीस ६५ भिक्षेकरी आहेत.


या जमिनीचा उपयोग संस्थेत दाखल होणाऱ्या भिक्षेकरी बांधवांना शेतीचे प्रशिक्षण देणे, शेतीतील उत्पन्नाचा उपयोग संस्थेसाठी व उर्वरित उत्पन्न बाजारभावात विकणे, यातून संस्थेतील प्रवेशीतांचा गरजा भागवणे, असा असताना गेली कित्येक वर्षे निधी अभावी शेतीचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे शेती नापीक बनली होती.ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ५० लाख रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या शेतीचा कायापालट करण्याची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून शेती प्रकल्प व मोकळ्या जागेत जांभूळ, शेवगा, लिंबू,बांबू आदी झाडे लावण्यास सुचविले प्रमाणे आज इंडोको रेमडिल लि .कंपनीचे जनरल मँनेजर, संजय घनघाव, निलेश भोळे, श्रीमती शारोन फेरनानडेस व त्यांच्या टिमने बांबूची लागवड केली,


यावेळी प्रथम जनरल मँनेजर संजय घनघाव यांच्या हस्ते इडोको रेमडिल लिमिटेड या कंपनीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी संजय घनघाव म्हणाले, कंपनीला ७५ वर्षे पुर्ण झाल्याच्या पित्यार्थ तसेच नदीच्या पुरामुळे जमिनीची होणारी धूप,पात्र रुंंदावणे, वृक्षारोपणातून निसर्गाचा समतोल राखणे आदी गरजेचे असल्याने तसेच या गावाचे नाव जांभूळ असल्याने या परिसरात जांभळाच्या झाडांची एक वनराई असावी. लोकांना रोजगार मिळावे, झाडांची निगा, ओछोछचठयातून मिळणारे उत्पन्न यापासून भिक्षेकरी गृह प्रवेशीताना सोईसुविधा, औषध आदी उद्देशासाठी हे वृक्षारोपण करण्यात आले आहे असे सांगून कंपनी तर्फे सर्व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ चे सरपंच परिक्षित पिसाळ हे म्हणाले, आमच्या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून कित्येक वर्षांपासून प्रंलबित असलेली स्मशानभूमी बांधली, सध्या गावामध्ये कोविड लसीकरणाचे ४थे सत्र सुरू असून गाव १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. आज येथे वृक्षारोपन होत आहे, यातून या भागाचा विकास होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.


जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनिता गोरे, ग्रामसेवक बाळू कोकणे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आदी मंडळी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री जवरे, फटागंरे, अभिजित नानगुडे यांनी प्रयत्न केले, जिल्हा कृषी अधीक्षक, माने यांनी शास्वत शेती योजनेसाठी ३ हजार रोपे उपलब्ध करून दिली या सर्वांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...