वळ गावचे सरपंच राम भोईर यांनी दिली शिवमंदिरास भेट.!!
🚩🚩🚩🚩🚩
अरूण पाटील, भिवंडी (कोपर) दि. २४
दिनांक २४.१०.२०२१ रोजी वळ ग्रामपंचायत च्या वतीने श्री. भिवंडी तालुक्यातील वळ गावचे कर्तव्य दक्ष सरपंच श्री. राम एकनाथ भोईर व त्यांचे सहकारी मराङे पाङा येथे शिवक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास भेट देऊन प्रतिष्ठानला आर्थिक मदत केली.
सरपंच श्री.राम भोईर ह्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. व माहीती घेतली. ह्या सत्कार्यासाठी एक सेवा भाव व छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेल्या मोठ्या योगदानाचे महत्व समजून महाराजांच्या शिव मंदिरासाठी कृताज्ञता म्हणून वळ ग्रामपंचायतिने अर्थिक खारीचा वाटा उचलला आहे. ह्या भिवंडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांनी आवाहन केले आहे की आपण सुध्दा ह्या सत्कार्या साठी पुढे येऊन आपल्या परीने जे शक्य होईल तेव्हढे योगदान करावे. या प्रसंगी वळ गावचे सरपंच श्री. राम भोईर, उपसरपंच श्री.मिथुन पाटील, सदस्य श्री.रामनाथ पाटील, सदस्य श्री.अमित भोईर,
उपतालुका प्रमुख श्री.चक्रधारी पाटील,शाखा प्रमुख श्री.अनंत भामरे उपशाखा प्रमुख श्री.दयाराम पाटील, श्री.निवृत्ती पाटील ( उपशाखाप्रमुख) *श्री.भगीरथ पाटील ( समाजसेवक )* *श्री.सचिन पाटील (उपविभागप्रमुख) हे पदाधिकारी व प्रतिष्ठाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment