भात कापणीत लागणा-या बांबूच्या'बंद'ची जागा घेतली प्लास्टिक च्या बंद ने? मुरबाड, सरळगाव, किन्हवली च्या बाजारात विक्री !
कल्याण, (संजय कांबळे) : भात कापणीत भाताचे भारे बांधायला, ते झोडायला, नंतर सरले बांधून पेंड्यांची विक्री होईपर्यंत अंत्यत उपयोगी पडणाऱ्या बांबूच्या बंद ची जागा आता प्लास्टिक च्या बंदाने घेतली असून मुरबाड, किन्हवली, सरळगाव च्या आठवडी बाजारात याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून याला शेतकऱ्यांची मागणी देखील वाढत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी,कल्याण चा ग्रामीण भाग आदी भागात मोठ्या प्रमाणावर भात पिक घेतले जाते.
ठाणे जिल्ह्यात ५ लाख, २४ हजार,४९१ इतके खातेदार आहेत. तर सुमारे ६ लाख ४५ हजार १७१ एकूण सातबारे असून यापेकी ५ लाख ४bहजार ९१ इतके शेतीचे सातबारे आहेत. त्यामुळे या परिसरात भात पिक घेतले जाते.
मुरबाडला तर भाताचे कोठार म्हटलं जातं. रत्ना,जया, आरपी, कर्जत, पनवेल, श्रीराम, आदी जातीचे भात लावले जाते, सर्वसाधारणपणे दसऱ्या नंतर या परिसरात भात कापणीला सुरुवात केली जाते. मजुर मिळाले तर ठिक नाहीतर, घरगुती माणसं या भातकापणीला सुरुवात करतात. या कापणीला कापलेल्या भाताचे, भारे बांधून ते खळ्यात ढिग मारुन ठेवले जातात. व वेळेनुसार हे भारे झोडले जातात, हे भारे मजबूत बांधावे लागतात. या साठी शेतकरी 'कोंब 'आलेले बांबू आणून ते चिरायचे, चिंदी पातळ पाडून ते दगडावर चेपायची, तिच्या पातळ लक-या/बंद बनवायचे, एक दोन दिवस उन्हात वाळवून मग ते भारे बांधण्यासाठी बंद म्हणून वापरायचे, एका बांबू पासून ७०/८० व मोठा असेल तर १०० च्या जवळपास बंद तयार होतात. हे साधारण एक वर्षे टिकतात असे शेतकरी सांगतात.
भात कापणीच्या वेळी कापलेले भारे,वाहणासाठी,ते झोडण्यासाठी,तसेच झोडलेल्या भाताचे सरले बांधण्यासाठी व पेंडा विक्री पर्यंत या बंदाचा वापर केला जात होता. गावात बांंबू न मिळाल्यास लांब जंगलात वनविभागाची नजर चुकवून जावे लागते व हे अडचणीचे ठरते.
परंतु आता काळ बदलला आहे, एकतर गावागावातील बांबू जवळजवळ नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. यासाठी वेळ व मेहनत घ्यावी लागते, दिवसेंदिवस तरुण पिढी शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. मजूर उपलब्धतेनुसार भात कापणी करावी लागते. यावेळी त्यांना वेळेवर साहित्य पुरविणे गरजेचं असतं. पुर, अतिवृष्टी, दुष्काळ, यामुळे आहे ते पिक तात्काळ घरी येणे आवश्यक असते. या सर्वांचा विचार करून शेतकरी आता प्लास्टिक च्या बंद कडे वळले आहेत. १५० रुपये किलो तर १३० रुपये शेकडा अशे बंदाचे दर आहेत, ३/४ मिटर लांब असलेल्या हे बंद कोठेही घेऊन जाणे सहज शक्य होते. सध्या मुरबाड, किन्हवली, सरळगाव या आटवडी बाजारात याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असून शेतकरी देखील ते खरेदी करत आहेत. त्यामुळे आता काळानुसार पंरपरा गत बांबूच्या बंद ची जागा प्लास्टिक च्या बंदने घेतली आहे असे म्हणायला हरकत नाही.
प्रतिक्रिया-प्लास्टिक कचे बंद टिकत नाही तर बांबूचे बंद हे वर्षभर टिकता. म्हणून आम्ही तेच वापरतो, -मधूकर रोहणे, शेतकरी पिंपळोली, ता. कल्याण.





No comments:
Post a Comment