Monday, 22 November 2021

श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे "श्री पाणबुडी चषक -२०२१" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे "श्री पाणबुडी चषक -२०२१" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !


मुंबई, ( दिपक कारकर ) :

मुंबई सारख्या शहरात कोकणची लोककला जाखडी नृत्य/ बहुरंगी नमन/ सामाजिक-शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे मुंबईत कोव्हिड - १९ च्या दिवसांत शासकीय नियमांचे पालन करून भव्य-दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे एकदिवसीय आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.५ डिसेंबर २०२१ रोजी ही स्पर्धा मुंबईतील चर्चगेट ( ओव्हल मैदान - साईड पिच ) येथे होणार असून एकूण ३२ संघाचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. ही स्पर्धा ४ गटात खेळवली जाईल ज्यामध्ये वाडी मार्यदित २ गट,गाव मर्यादित १ गट, व १ खुला गट अशा स्वरूपाची ही स्पर्धा असेल.

या स्पर्धेतील ४ गटातून विजयी प्रथम क्रमांकाचे चार संघ यांना प्रत्येकी रोख रक्कम रुपये १०,००० / व आकर्षक चषक व मालिकावीर खेळाडूला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रदिप कातकर - ८८५०४३४९८८, सुनिल डिंगणकर - ९७०२१५५९५९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री पाणबुडी देवी कलामंचा तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !! महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्...