उल्हासनगर येथे 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार, जावई फरार.!!
भिवंडी, दिं,5, भिवंडी, (कोपर) :
ठाण्याजवळ असलेल्या उल्हासनगर येथे लाजिरवाणी अशी घटना घडली आहे. जिथे सासू-सुनेचे नाते कलंकित झालं आहे. 27 वर्षांच्या जावयावर आपल्या 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यादरम्यान आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR ची माहिती मिळताच आरोपी जावई फरार झाला आहे. सध्या पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.
या घटनेत पोलीस अधिकार्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावईही उल्हासनगर येथे राहतो. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी जावई लग्नापूर्वी पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेमुळे तो सासूशी लग्न करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. अशा परिस्थितीत दोघांनी 2018 साली लग्न केलं. या दरम्यान ही घटना घडली असून सासूनं जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण प्रेम प्रकरणाचे आहे. त्याचबरोबर पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेपासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याला लवकरच अटक करण्यात येईल. असे तपास अंधकाऱ्यानी सांगितले.

No comments:
Post a Comment