भारतीय कम्युनिस्ट पक्ष दलित अधिकार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार पुकारनार ! तालुका आयटक कार्यालयाचे जीर्णोद्धार उद्घाटन संपन्न !!
चोपडा, बातमीदार.. येथे महात्मा ज्योतिबा फुले नगर मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिलची बैठक राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे नेते कॉम्रेड अमृतराव महाजन व जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली त्यावेळी गतकाळातील कामाचा अहवाल जिल्हा सचिव काँ लक्ष्मण शिंदे अमळनेर यांनी मांडला.
सुरुवातीला झालेले औरंगाबाद येथील दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व जळगाव जिल्हा भाकपचे मार्गदर्शक नेते काम रेड एडवोकेट मनोहर टाकसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत कॉम्रेड स. ना. भालेराव यांना 105 व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. या बैठकीत निर्णय झाले ते असे.. येत्या 19 व 20 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे दलित अधिकार अधिवेशन भारतीय मजदूर युनियन तर्फे पक्षाचे अखिल भारतीय सचिव कॉम्रेड डी राजा यांच्या उपस्थितीत घेण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातून दलित अधिकार कार्यकर्ते ५० प्रतिनिधी नेण्याचे निर्णय घेण्यात आला. या अधिवेशन तयारी साठी *चोपडा येथे 14 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दलित अधिकार अधिवेशन घेण्याचे ठरले* त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दलित श्रमिक जनतेत काम करणारे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातुन महाराष्ट्र किसान सभेने लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांच्या जमावावर गाडी केंद्रीय गृह राज्य मंत्रीचे मुलाने वाहन चालवले ने चार शेतकरी व एक पत्रकार मारला गेला. या पाच शहिदांच्या शहीद अस्थिकलश महाराष्ट्रात निघाली त्याची सुरुवात आठ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातून करण्यात आली त्यावेळी जळगाव जिल्ह्याने सहा सभा घेतल्या व त्यात किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ विज वर्कर्स फेडरेशन अंगणवाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही कार्यकर्ते शिवसैनिक लोकसंघर्ष मोर्चा व शेतकरी सुकानु समिती यांच्या सहभागाबद्दल आभार मानण्यात आले.
तसेच कलकत्ता येथे नुकतेच अखिल भारतीय शेतमजूर युनियन राष्ट्रीय कमिटी जी बैठक झाली त्या बैठकीचे रिपोर्टिंग कॉम्रेड महाजन यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीमाला स हमीभाव व शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि आंदोलनातील शेतकरी कामगारांवरील केस जोपर्यंत मोदी सरकार मागे घेत नाही तोपर्यंत किसान आंदोलन सुरूच राहील या निर्णयाला भारतीय कम्युनिस्ट पक्श पाठिंबा राहील असा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने चालवलेल्या मनमानी वीज कारभाराचा निषेध करणारा v कनेक्शन तोडण्याच्या निर्णयाविरुद्ध मोहिदे सबस्टेशन वर्क शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाकप जिल्हा कमिटीने दिलेला आहे. तसा ठराव का गोरख वानखेडे यांनी मांडला होता विविध समाज उपयोगी कामे यासाठी कार्यकर्त्यांचा समावेश असलेला कॉम्रेड स. ना. भालेराव व्ही बी मोरे ट्रस्ट उभारण्याचे ठरले त्यासंबंधी अधिकार कॉम्रेड महाजन यांना देण्यात आले *जळगाव येथील बळीराम पेठ मधील ट्रेड युनियन सेंटर कार्यालय दुरुस्त करण्यासाठी वीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. व या कार्यालय दुरुस्तीच्या उद्देशाने कॉम्रेड अम्रुत महाजन यांनी जो रुपया/ रुपया जमा करून जो गल्ला तयार केला तो गल्ला कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आला त्यात 4950 रुपये रक्कम निघाली उर्वरित रक्कम निधी जमा करून कार्यालय दुरुस्ती करा पूर्ण करावी असे ठरले* या बैठकीला सरतेशेवटी तालुका सचिव काम रेड छोटू पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर कौन्सिल सदस्य बस स्टँड समोरील जीर्णोद्धार करण्यात आलेले तालुका आयटक कार्यालय जवळ गेले उद्घाटन जिल्हा सचिव कॉम्रेड लक्ष्मण शिंदे जीर्णोद्धार झालेल्या कार्यालयाचे यांनी केले.
या बैठक कार्यक्रमाला सर्वश्री गुरुदास विजय मोरे, दिलीप पाटील, गोरख वानखेडे, छोटू पाटील, शांताराम पाटील ,प्रमोद ठाकूर, जळगाव ,गुलाब शहा चोपडा. असलम खलील, ज्ञानेश्वर कन्हैया, छोटू पाटील गरताडकर आदी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment