Sunday, 5 December 2021

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा ; "पुणेला विजेतेपद तर मुंबई उपविजेते" 'सांगली तृतीय स्थानावर'

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा ; "पुणेला विजेतेपद तर मुंबई उपविजेते"  'सांगली तृतीय स्थानावर'


ठाणे, बातमीदार : पुणे च्या खेळाडू निस्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत 109 गुणासह विजेतेपद पटकावले तर मुंबईच्या संघाने 94 गुणासह स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले सांगली संघास 35 गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले तर पुमसे स्पर्धेत मुंबईने विजेतेपद तर यजमान पालघरने उपविजेतेपद पटकावले. 


मुंबईच्या संघाने स्पारिंग आणि पुमसे या दोन्हीमध्ये आघाडी घेत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावून राज्य स्पर्धेवर आपले नाव कोरले 
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन आँफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने 33 व्या स्पारिंग व 9 व्या पुमसे राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन पालघर विरार येथे करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातून 750 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेते आगामी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, स्पर्धेचे आयोजक आणि पालघर अध्यक्ष अजील चाको, तायक्वांदो उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, मिलिंद पाठारे तांत्रिक कमिटीचे भास्कर करकेरा प्रविण बोरसे सुभाष पाटील गप्पार पठाण सुरेश चौधरी दुलीचंद मेश्राम वेंकटेश कररा तसेच आयोजन समिती  राजा मकवाना, प्रसाद घाडी, परेश राऊत, नवीन दवे,  योगेश जोशी, दिव्या मकवाना व आदी मान्यवर उपस्थितीत होते. स्पर्धेचे 


प्रतिक्रिया :-
तायक्वांदो इंडिया अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संपन्न झालेली पहिलीच स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आणि या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा  मूळे राज्यातील तायक्वांदोला नवी संजीवनी मिळणार असून तायक्वांदो खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी स्पर्धेची व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला आहे आणि पुढील स्पर्धा ही अशाच हायटेक कशा होतील याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार असून
खेळासाठीं एकत्र येऊन तायक्वांदो खेळाला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- संदीप ओंबासे, महासचिव


राज्यस्तरीय स्पर्धे मधील सुवर्णपदक विजेते मुले आणि मुली खालीलप्रमाणे

मुले :- 
निलेश पाटील -  जळगाव, नीरज चौधरी - धुळे, शिवम शेट्टी - पुणे, श्रीतेज झगडे - पुणे, सुरज चव्हाण - पुणे, 
विशाल लामखडे - पुणे, गौरव कुडले - पुणे, गौरव भट -  सांगली, 

मुली :- 
मृणाल वैद्य - पुणे, निशिता कोतवाल - पुणे, शिवानी भिलारे -  पुणे, स्वप्नाली घेमुंड - अहमदनगर, स्वप्नाली शिंदे -  अहमदनगर, रुचिका भावे - पुणे, श्रेया जाधव - मुंबई, ऐश्वर्या रावडे - पुणे

- अविनाश 
9820991450

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...