Saturday, 4 December 2021

नाट्य क्षेत्रासाठी सीताराम गावकर यांचे योगदान अभिमानास्पद- ऋषिनाथजी दादा पत्याणे 'पत्नी सह दोन्ही मुली चालवत असलेल्या त्यांच्या कलेच्या वारश्याला श्री. ऋषिनाथजी दादा पत्याणे यांनी मानले आभार'

नाट्य क्षेत्रासाठी सीताराम गावकर यांचे  योगदान अभिमानास्पद- ऋषिनाथजी दादा पत्याणे

'पत्नी सह दोन्ही मुली चालवत असलेल्या त्यांच्या कलेच्या वारश्याला श्री. ऋषिनाथजी दादा पत्याणे यांनी मानले आभार'


लांजा, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
      निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या लांजा तालुक्यातील कांटे या गावचे सुपुत्र आणि मुंबईतील नाट्यक्षेत्रासाठी ज्यांचे मोठे योगदान होत, ते कै. सीताराम गावकर यांचे  नाव कोकणातील खूप लोकांना माहिती नाही आहे. अभिनेत्री भक्ती बर्वे - इनामदार यांच्या "आई रिटायर्ड होतेय" या नाटकाचे निर्माते आणि महालक्ष्मी थिएटर्स चे सर्वेसर्वा कै. सीताराम गावकर यांचे तालुक्यातील कांटे हे जन्मगाव. नाट्यक्षेत्रामध्ये आपल्या जिद्दीच्या जोरावर गगन भरारी घेणाऱ्या कै. सीताराम गावकर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी रत्नभूमिशी बोलताना स्वराज्य प्रतिष्ठान लांजाचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री ऋषिनाथ दादा पत्याणे म्हणाले की, सीताराम गावकर यांचा हा कलेचा वारसा त्यांच्या कन्या ज्योती सीताराम गावकर, शीतल सीताराम गावकर आणि पत्नी सुषमा सीताराम गावकर यांनी पुढे नेताना प्रामुख्याने "मन फितूर" या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आपला लांजा तालुक्यातील कांटे या गावची निवड करणं म्हणजेच  आपल्या जन्मभूमीची ओढ आणि तेथील स्थानिक कलाकारांना सिनेसृष्टीच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक दिवाकर मोहिते, ज्येष्ठ कलाकार नारायण जाधव, नम्रता गायकवाड म, विजया महाजन, प्रभाकर मोरे, नयन जाधव, दिगंबर नाईक, सूत्रधार प्रवीण दळवी आणि निर्मिती सह व्यवस्थापक शिवाजी रेडेकर सर अशा मातब्बर टीम सोबत येथील काही कलाकारांना घेवून या सिनेमाची निर्मिती कांटे या सारख्या छोट्या गावामध्ये सीताराम गावकर यांच्या जन्मगावी होतेय याचा आनंद होतोय. स्वराज्य प्रतिष्ठान लांजा परिवाराकडून तथा स्वराज्य प्रतिष्ठान लांजा संस्थापक श्री. ऋषींनाथ दादा पत्याणे, अध्यक्ष श्री. विनायक खानविलकर यांनी मन फितूर या चित्रपटाच्या सर्व टीमचे आणि सीताराम गावकर यांच्या कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या गावकर कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...