विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर-४ येथे शांतता समिती व पोलीस मित्र यांची सभा संपन्न......
उल्हासनगर, अनिल मराठे :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व शहरातील कायदा आणि सुव्यवस्था या संबंधी विचार सभा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, उल्हासनगर-४ येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. आपापल्या विभागात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्व उपस्थितांनी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शांतता समिती सदस्य प्रा. प्रकाश माळी सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आम्ही प्रत्येक जण साध्या वेषातील पोलीस आहोत व आपण सांगाल ती जबाबदारी स्वीकारण्याची आमची तयारी आहे. या प्रसंगी शांतता समिती व पोलीस मित्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या सभेसाठी शांतता समिती सदस्य व पोलीस मित्र बापू सावंत, राजू माने, प्रा. प्रकाश माळी सर, अनिल मराठे, प्रकाश देशमुख, संभाजी चोरघडे, अशोक चव्हाण, टिनू कांबळे, महेश विसपुते, पत्रकार श्री. धांडे, राहुल वायकर, विनोद भोईर, रोहिदास भोईर, प्रदीप गोडसे, संजीवनी भानुशाली व इतर सदस्य उपस्थित होते.


No comments:
Post a Comment