Sunday, 5 December 2021

मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड पेट्रोलिंगला मोठे यश चोरांना रंगे हात पकडून केली कारवाई !!

मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड पेट्रोलिंगला मोठे यश चोरांना रंगे हात पकडून केली कारवाई !! 


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड शहरात वाढलेल्या चोरीचे प्रमाण पाहता मुरबाड पोलिसांनी केलेले नियोजन, आणि नजिकच्या काळात मुरबाड पोलिसांच्या आयोजीत रिंग राउंड पेट्रोलिंगला मोठे यश मिळाले असुन, मुरबाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलीस निरीक्षक सोनवणे, उपनिरीक्षक शेंडे व हेडकॉंस्टेबल. निचिते, पो. ना. मोरे, शिंदे व स्टाफ़ यांच्या सतर्क गस्ती मुळे दोन संशयित इसम गस्ती दरम्यान भेटल्याने त्यांच्या चौकशीत त्यांनी मुरबाड स्थित मिंडा कंपनीतुन पुर्ण नियोजन पद्धतीने नियोजन व संगनमत करून तेथून ३२ किलो वजनाचे अंदाजे ६०,०००/ रुपये किमतीचे कॉपरचे वायर बंडल चोरल्याचें सांगितले. 


सदर चोरीचें वायर बंडल पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेवून मिंडा कंपनीचे HR विभागाशी सम्पर्क करून खात्री केली असता तेथूनच सदर वायर बंडल चोरी झाल्याचे त्यांनी पाहून खात्री करून सांगितले व सीनियर मँनेजर (HR) श्री मिश्रा यांच्या फ़िर्यादी वरून चोरीचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 


सदर चोरीसाठी ज्या टेम्पो ड्राइवरने स्वतः सहभागी होऊन चोरी साठी मदत व हिस्सेदारी बजावली होती त्याला देखिल पोलिसांनी अटक करुन त्याचा टेम्पो जप्त केला आहे. 


पोलिसांच्या ह्या कारवाईने चोर गुन्हेगारात पोलिस कारवाईची भिती निर्मान झाल्याने मुरबाड शहरात गुन्हे प्रतिबंध करण्यात मुरबाड पोलिसांना मोठे यश आले आहे व त्यांच्या रिंग राउंड पेट्रोलिंग चे मुरबाड रहीवाश्या कडून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...