कल्याण तालुक्यातून संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !!
कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण कल्याण तालुक्यातून त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
६ डिसेंबर १९५६ साली दिन दलित, गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी आदीचा मुक्तीदाता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, त्यांनी उभ्या हायातीत केवळ आणि केवळ समाजाचाच विचार केला, स्वतः भोगलेले कष्ट, दु:ख हाल अपेष्टा समाजाच्या वाट्याला येवू नये म्हणून अखेर पर्यंत प्रस्थापिता विरोधात लढाई लढली, उच्च शिक्षण घेऊन सर्वांना झुकवले, संकटाच्या काळात देशाची घटना लिहिली, म्हणूनच त्यांना घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माते, मुक्तीदाता म्हटले जाते, असा हा झझांवात ६ डिसेंबर ला शांत झाला. मुंबई येथून निघालेली त्यांची अंतयात्रा ऐतिहासिक ठरली, तो हा दिवस देश विदेशात अभिवादन दिन साजरा होतो.
असाच कल्याण तालुक्यातील कांबा पाचवा मैल ग्रामस्थ, वाघेरापाडा नागरिक, गोवेली रेवती ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा जाधव, समाजसेवक दिपक जाधव, जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ शितल कांबळे, मुंबई भांडूप येथील तृप्ती लोंखडे, आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, कल्याण पंचायत समिती, तसेच सर्व ग्रामपंचायत मधून ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना, संस्था यांनी ही बाबासाहेबांना अभिवादन केले.
ओमिक्राँनच्या वाढत्या भितीने शासनाने भीम अनुयायांना ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर न येण्याचे आवाहन केलं होत. त्यामुळे याला मान देऊन लाखो नागरिकांनी घरोघरी डॉ बाबासाहेब आंबेडकर या मुक्तीदात्याला अभिवादन केले, म्हारळ, वरप, कांबा रायते, गोवेली, टिटवाळा, पासून जवळपास संपूर्ण तालुक्यातून अभिवादन करण्यात आले.



No comments:
Post a Comment