Monday, 6 December 2021

वाहतूक विभागाचे शुभम मिश्रा यांच्या कार्यातून माणुसकीचे दर्शन.. अपघातग्रस्त वयोवृद्ध नागरिकास वेळेवर उपचारासाठी दाखल करून ट्रॅफिक वॉर्डन शुभम मिश्रा यांनी प्राण वाचवले.

वाहतूक विभागाचे शुभम मिश्रा यांच्या कार्यातून माणुसकीचे दर्शन..

अपघातग्रस्त वयोवृद्ध नागरिकास वेळेवर उपचारासाठी दाखल करून ट्रॅफिक वॉर्डन शुभम मिश्रा यांनी प्राण वाचवले. 


कल्याण, बातमीदार : जयराज नायडू हे आपल्या MH 05 DY 7470 या ॲक्टिवा बाईकने येत असताना शहाड जवळ अचानक स्पीड ब्रेकर वरून गाडी स्लीप झाली आणि 10 ते 15 फूट घसरली गेली त्यामुळे नायडू यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मार लागला त्यातच त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. 


अपघाताच्या ठिकाणी बरेच नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती परंतु या घटनेची चाहूल लागताच कल्याण वाहतूक विभागाचे ट्रॅफिक वॉर्डन हे कर्तव्यावर होते त्यांनी कशाचाही विचार न करता नायडू यांना ताबडतोब खांद्यावर घेऊन रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व उपचार करण्यासाठी विनंती करून अपघातग्रस्तांच्या मुलाला फोनवरून संपर्क साधून बोलावून घेतले या दरम्यान थोडा उशीर झाला असता तर नायडू यांच्या जीवाला धोका होता परंतु ट्रॅफिक वॉर्डन शुभम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नायडू यांचा  जीव वाचला. शिवम् मिश्रा यांचे नायडू परिवाराने .तसेच वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक तरडे साहेब आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त धर्माधिकारी साहेब यांनी शुभम मिश्रा यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. मिश्रा यांनी दाखवलेल्या माणुसकीतुन बघणाऱ्या लोकांना देखील माणसात देव दिसेल आणि ट्रॅफिक विभागाचेही नाव पुढे आले अश्या शब्दात RSP कमांडर मणीलाल शिंपी यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...