Monday, 6 December 2021

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या दक्षिण ठाणे शहर तालुका समितीचे २३ वे अधिवेशन उत्साहात संपन्न !!

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या दक्षिण ठाणे शहर तालुका समितीचे २३ वे अधिवेशन उत्साहात संपन्न !!


भारत देश मागील ३ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना आरोग्य व्यवस्था बळकट न करता तसेच शिक्षण, रोजगार, सर्व सार्वजनिक मालमत्तेचे होत असलेले खासगीकरण या सारखे जन विरोधी धोरण आणि निवडणूक जिंकण्यासाठी धर्मांध राजकारण केंद्रीय सरकार  राबवत असून भांडवलदार धार्जिणे कारभार करत आहे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ची दक्षिण ठाणे शहर तालुका समिती केंद्र सरकारच्या या धोरणांना तीव्र विरोध करत आहे. 




पक्षाच्या घटना व कार्यक्रम नुसार दर तीन वर्षांनी अधिवेशन घेणे अपेक्षित आहे परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे त्रस्त असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना व गरीब जनतेच्या सामाजिक सेवेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी वाहून घेतल्यामुळे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या दक्षिण ठाणे शहर तालुका समिती ला निश्चित असलेले २३ वे अधिवेशन वारंवार पुढे ढकलावे लागले, समितीच्या पुढील कार्यवाहीसाठी हे अधिवेशन घेणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार ५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे अधिवेशन मोठ्या  उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाचा भाग म्हणून जन रॅली काढण्यात आली. ही रॅली भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दक्षिण ठाणे शहर तालुका समितीच्या उल्हासनगर पूर्व येथील कार्यालय साई किरण अपार्टमेंट उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ येथून सकाळी ९ वाजता पक्ष झेंडा अभिवादन करून ९.३० ला रॅली सुरु करण्यात आली तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष टेकडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त करण्यात आली.


त्यानंतर सभा व अधिवेशन उदघाटन सत्र पार पडले, या सत्रात कॉ. प्रीती शेखर (DYFI राज्य सचिव), कॉ. किरण गहला (CPM राज्य समिती सदस्य), कॉ. नंदू हडळ (तलासरी पंचायत समिती सभापती) यांनी मार्गदर्शन केले तसेच या अध्यक्षीय भाषण कॉ. सुनील चव्हाण यांनी केले. यानंतर अधिवेशन पार पडले, या अधिवेशनात सद्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, प्रमुख विषयांचे ठराव मांडण्यात आले, सचिव कॉ. पी के लाली यांनी प्रस्तुत केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली त्यानंतर या अधिवेशनात १७ सदस्यीय तालुका समिती निवडण्यात आली, या अधिवेशनाने कॉ. पी के लाली यांची सचिव पदी पुनर्नियुक्ती केली. शेवटी घोषणांच्या निनादात अधिवेशन समाप्त झाले. 


अधिवेशन सार्वजनिक मित्र मंडळ  हॉल उल्हासनगर पूर्व येथे सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत ५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडले. 


सदर रॅली व संपूर्ण अधिवेशन कोविड १९ च्या नियमावलीत नमूद करण्यात आलेल्या नियमानुसार पार पाडण्यात आले.

आपला विनीत 
कॉ. पी के लाली
सचिव, दक्षिण ठाणे शहर तालुका समिती 
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
+91 88880 06149

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...