Monday, 6 December 2021

रायगड किल्ल्याला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब- राष्ट्रपती रामनाथ कोविंद "निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजी राजांचे मानले आभार"

रायगड किल्ल्याला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

"निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजी राजांचे मानले आभार" 


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. याच प्रसिद्ध किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजी राजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती गोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले.




         आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले की, "रायगड किल्ल्याला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या यात्रेला आपण तीर्थक्षेत्र मानतो, असे ते म्हणाले. निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजी राजांचे आभार मानले. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले की, विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते." राष्ट्रपतींनी आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. याशिवाय गडावरच असलेल्या जगदीश्वर मंदिरालाही भेट दिली.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...