Thursday, 16 December 2021

कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात महाआवास अभिमान टप्पा क्रमांक दोन ची कार्यशाळा उत्साहात संपन्न !

कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात महाआवास अभिमान टप्पा क्रमांक दोन ची कार्यशाळा उत्साहात संपन्न !


कल्याण, (संजय कांबळे) : प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना, ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मध्ये गतिमानता व गुणवत्ता आणणेसाठी राज्य भर 'महा आवास अभिमान' राबविण्यात येत आहे.. त्याच्या कार्यशाळेचे आयोजन कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात माझी सभापती, रंजना केतन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती भरत भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले होते.


प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.


स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्रीमती विशाखा परटोले यांनी केले, त्या म्हणाल्या, सर्वासाठी घरे, हे केंद्रे शासनाचे महत्त्वपुर्ण धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास,शबरी घरकुल, आदिम जमाती, पारधी आवास, अटल बांधकाम, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून त्यांना पूरक पंडित दिनदयाल उपाध्यक्ष घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्यक योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना विषयी उद्बोधक माहिती दिली.


याविषयी अधिक बोलताना त्या म्हणाल्या, महा आवास अभिमान ग्रामीण २०२० अंतर्गत कल्याण तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावत ३५ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३८ घरकुलांना मंजुरी दिली, मंजूर केलेल्या घरकुलापैकी २३ लाभार्थ्यांना प्रथम हफ्ता वितरित केला, २२ घरकुले भौतिक दृष्टया पुर्ण झाली, तर राज्य पुरस्कृत ४५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली, त्यांनी प्रथम हफ्ता देखिल देण्यात आला. ४० घरकुले भौतिक दृष्टया पुर्ण करून तालुक्यातील गोवेली येथे एक डेमो हाऊस व घरकुल मार्टची उभारणी करण्यात आली.तसेच महा आवास अभिमान ग्रामीण २०२१, २२ अंतर्गत १० उपक्रमाची कशा प्रकारे अमलबजावणी करायची याचेही आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.


यावेळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या कडे वेळ कमी आहे, जे लाभार्थी अपात्र झाले आहेत, परंतु तुम्हाला ते खरेच पात्र आहेत असे वाटत असेल तर त्यांची यादी ताबडतोब, पंचायत समितीकडे पाठवावी, त्यावर तालुका समिती निर्णय घेईल,तसेच कोणी ओळखीचा असेल, जुने घर दाखवून नवीन घेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ग्रामसेवक व सरपंच यांनी खबरदारी घ्यावी, घरकुलांचे आँनलाईन पेमेंट असल्याने कोणतेही चुकीचे काम करु नका असा दमही दिला. सर्वांनी युध्द पातळीवर काम करुन अपिलांचे प्रस्ताव पाठवा असेही त्यांनी सांगितले.

तर माझी उपसभापती यशवंतराव दळवी यांनी आपल्या भाषणात घरकुलांचे निकष खूपच अडचणी चे असल्याचे सांगितले, त्यामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याचे ते म्हणाले, तर पत्रकार संजय कांबळे यांनी ही आपल्या मार्गदर्शन पर भाषणात ग्रामसेवक व सरपंच यांना विनंती केली की आपण अजून थोडी मेहनत घेतली तर जे अनेक लाभार्थी तांत्रिक या इतर कारणांमुळे अपात्र ठरले आहेत, ते पात्र ठरतील व त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होईल, तर आजच्या या कार्यशाळेच्या अध्यक्ष रंजना देशमुख म्हणाल्या, आम्ही सर्व सदस्य घरकुलांविषयी आपल्याला सहकार्य करायला तयार आहे, तसेच आपल्या तालुक्याचे काम उत्तम व समाधान कारक आहे,असे सांगून भविष्यात जास्तीत जास्त लाभार्थी घरकुले देण्याचा प्रयत्न करावा असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर कल्याण पंचायत समितीचे उपसभापती भरतशेठ भोईर, झेडपी सदस्यां रेश्मा मगर, पंचायत समिती सदस्या,अस्मिता जाधव,रेश्मा भोईर, यशवंत दळवी, आ कुमार आयलानी यांचे स्वीयसहाय्यक श्री सोनार, उप अभियंता बांंधकाम ,पत्रकार संजय कांबळे, तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,सरपंच, लाभार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी (कृषी) संत यांनी मानले.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...