Wednesday, 15 December 2021

कोव्हिडं नंतर सुरू झालेल्या शाळेतील पहिल्या दिवशी सिक्रेट हार्ट स्कुलने विद्यार्थ्याचे केले स्वागत ..... "विद्यार्थ्यांसाठी खेळाचे व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन"

कोव्हिडं नंतर सुरू झालेल्या शाळेतील पहिल्या दिवशी सिक्रेट हार्ट स्कुलने विद्यार्थ्याचे केले स्वागत ..... 

"विद्यार्थ्यांसाठी खेळाचे व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन"
 

कल्याण, ऋषिकेश चौधरी : कोव्हिडंच्या पादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी शालेय शिक्षणा साठी शाळेतील उपस्थिती पासून वंचित होते.


मात्र गेल्या काही महिन्या पासून कोव्हीडचा पादुर्भाव ओसरल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने बऱ्याच दिवसापासून शाळे पासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याचे पर्वणीच मिळाली आहे. 


कल्याण तालुक्यातील वरप गावातील सिक्रेट हार्ट स्कुलने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत मोठ्या थाटमाटात केले विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल,  बैलगाडी फेरी, घोडगाडी फेरी, हडल्स, डांस, अशा विविध खेळांचे आयोजन केल्याने पहिल्या सत्रातील सुमारे ९५ टक्के तर दुसऱ्या सत्रातील ९६ टक्के विद्यार्थ्यानी शाळेत उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेच्या पहिल्या दिवसाचा मनसोक्त आनंद घेतला.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...