Wednesday, 15 December 2021

कल्याण ग्रामीण भागात बिबट्या कडून शेतकऱ्यांची दे दणादण, उडवून' धूम धडाका सुरू, नागरिकांमध्ये चिंता?

कल्याण ग्रामीण भागात बिबट्या कडून शेतकऱ्यांची दे दणादण, उडवून' धूम धडाका सुरू, नागरिकांमध्ये चिंता?


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या कित्येक दिवसापासून कल्याण ग्रामीण भागात बिबट्या आहे नाही अशी खमंग चर्चा चालू असतानाच एकदा चा तो ट्रप कँमे-यात कैद होऊन त्याचे अस्तित्व सिध्द झाल्यानंतर मात्र त्याने शेतकऱ्यांच्या कुत्री, बक-या मेंंडी,वासरे याची दे दणादण उडवून दिली असून सोबतच जंगलात धूम,'धडाका'सुरू केल्याने नागरिकांमध्ये भितीदायक चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याला पिंजरा लावून पकडून सुरक्षित जंगलात सोडावे अशी मागणी जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी केली आहे.


मागील दोन तीन महिन्यापूर्वी कल्याण ग्रामीण भागात बिबट्या च्या अतिरंजक कथा, पटकथा, विडिओ, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजमाध्यमावर टाकले, यामुळे वनविभागाला कमालीचा त्रास झाला, मात्र १६ आँक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा जांभूळ परिसरात बिबट्या दिसल्या ची वार्ता आली,यानंतर मात्र वसत येथील शेतकरी गुरुनाथ माळी यांचे वासरावर हल्ला केला वर येथे वनविभागाने लावलेल्या ट्रप मध्ये त्याचे फोटो आले. आणे, पठारपाडा येथे कुत्र्यावर हल्ला झाला, यामुळे कल्याण वनविभागाने जांभूळ, वसत, नांलिबी, आदी जंगल परिसरात कुणी जाऊ नये,काळजी घ्यावी, समूहाने फिरावे, रात्रीच्या वेळी टाँँर्च/बँटरी चा वापर करावा, या भागातून एकट्या ने जाऊ नये असे आवाहन केले होते. तसेच खडवली, कुंदा, दहागाव, कल्याण असे चार बिटातील वनकर्मचारी रात्रंदिवस फिरून लोकांना काळजी घेण्यास सांगत होते.


परंतु काही लोक याकडे दुर्लक्ष करत होते. नुकतीच नांलिबी येथे बिबट्याने शेळीची शिकार केली,तर जांभूळ ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली तर्फे चोण या महसुली गावातील हेमंत आयरेकर यांच्या शेतात कुत्र्यावर हल्ला केला. तसेच रानोमाळ फिरणाऱ्या धनगर समाजाच्या मेंढपाळातील मेंंढी फस्त केली, अशा प्रकारे सध्या कल्याण ग्रामीण भागात बिबट्या ने कुत्री, बकरी, शेळी, मेंढी यांच्या वर हल्ले केले आहेत. सुदैवाने अद्याप तरी मनुष्यावर हल्ला झाला नाही, त्यामुळे जंगलात पिंजरा लावण्यात काही कायदेशीर अडचणी येत असल्यास आमच्या खाजगी जागेत पिंजरा लावून बिबट्या ला पकडून सुरक्षित जंगलात सोडावे, मनुष्यावर हल्ला करण्याची वाट वनविभागाने करु नये अशी मागणी जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी केली आहे. तसेच पिंजरा लावण्याबाबतीत अनेक ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत. तर मनुष्याप्रमाणे वन्य प्राणी सुरक्षित राहिले पाहिजेत,जंगल हा त्यांचा अधिवास आहे, मनुष्याने त्यांच्या अधिवासात जाऊ नये,काळजी घ्यावी, समूहाने फिरावे, आम्ही वरीष्ठांकडे या बाबतीत मागणी, पत्रव्यवहार केला आहे, असे वनविभागाकडून सांंगण्यात आले, त्यामुळे बिबट्याच्या वावर क्षेत्राविषयी जनजागृती, स्वतःची काळजी घेणे, त्याच्या अधिवासात न जाणे हाच पर्याय सध्या तरी लोकांसमोर आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...