Wednesday, 15 December 2021

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मँरेज हाँल मालकांकडून कोरोना नियम पायदळी, तूफान वाहतूक कोंडी, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओ कडे तक्रार !

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मँरेज हाँल मालकांकडून कोरोना नियम पायदळी, तूफान वाहतूक कोंडी, पोलिसांचे दुर्लक्ष, आरटीओ कडे तक्रार !


कल्याण, (संजय कांबळे) : म्हारळ, वरप कांबा या गावाच्या मधून कल्याण नगर महामार्ग जातो, अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असल्याने या रस्त्यावर कायम वाहनांची येजा सुरू असते, त्यामुळे धुळ व खड्डे असा त्रास असतोच, अशातच आता कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध मँरेज लाँन्स कडून ओमिक्रोनच्या संकटात नियमांची पायमल्ली होत असून पोलीस, वाहतूक शाखा व आरटीओ याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याने या विरोधात कल्याण आरटीओ कडे तक्रार करण्यात आली आहे.


कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत, महाराजा, सपना,रेडचिल्ली,रिव्हर्स गार्डन, रिव्हर्स वुड, मोहन, असे ५/७ मँरेज हाँल आहेत,यातील एक किंवा दोघाकडे फक्त वाहनपार्किंग ची सोय आहे.


सध्या लग्न सोहळे सुरू झाल्याने व यांना पार्किंग नसल्याने विवाह सोहळा साठी येणारे मंडळी कल्याण मुरबाड रस्त्यावरच वाहने उभी करतात, यातून तूफान वाहतूक कोंडी व धुळ उडते या संदर्भात विचारणा केली तर हाणामाऱ्या, मारामारी होतात. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सध्या सर्वत्र ओमिक्रोनचे संकट आले असताना, लोकांनी गर्दी करु नये, उपस्थितीवर बंधन, मास्क वापरावे असे निर्बंध घातले असताना या मालकाकडून सर्रासपणे याचे उल्लंघन होतांना दिसत आहे, ५००/ १००० लोक या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत, तसेच यांच्या वराती या वरप गावापासून काढल्या जातात, यामुळे कल्याण मुरबाड महामार्गावर तूफान वाहतूक कोंडी होत आहे.


मागील आठवड्यात तर चक्क केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांना महाराजा लाँन्स मुळे वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागले होते. सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्या या रस्त्यावर उभ्या केल्या जातात. याबाबत त्यांना काही बोलल्यास नागरिकांमध्ये व त्यांच्यात हाणामाऱ्या, मारामारी होतात. असे प्रकार घडलेले आहेत, शिवाय या सोहळ्यासाठी येणाऱ्या शेकडो लोकांचे ड्रेनेज चे पाणी उल्हास नदीत सोडले जाते. 


दुर्दैव म्हणजे हा सर्व प्रकार, पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांना माहिती असूनही काही कारवाई होत नाही, कारण या सोहळ्याची "दक्षिणा" प्रत्येक विभागाच्या 'भडजीला' वेळेवर दिली जाते. याचा सर्वाधिक त्रास म्हारळ, वरप कांबा आदी गावातील लोकांना बसत आहे, त्यामुळे अशा प्रदूषण करणाऱ्या, कोरोनाला पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या, वाहतूक कोंडी ला कारणीभूत ठरणाऱ्या, सर्व नियम पायदळी तूडवणा-या महाराजा, लाँन्स सह इतर सर्वावर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी का़बा पावशेपाडा गावातील ग्रामस्थ चंद्रकांत भगत यांनी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तालुका पोलीस ठाणे, गटविकास अधिकारी कल्याण पंचायत समिती, यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.या संदर्भात कल्याण आरटीओ तानाजी चव्हाण यांना विचारले असता हा परिसर आमच्या ज्युडिशियल कक्षेत येत नाही, ट्राफिक पोलीस, पोलीस ठाणे किंवा ग्रामपंचायत यांनी संबंधितांवर पार्किंग ची व्यवस्था करण्यास भाग पाडून किंवा तसे न केल्यास त्यांचा परवाना रद्द का करण्यात येवू नये अशी नोटीस देऊन कारवाई करायला हवी असे सांगितले. 


No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...