नाईट शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम !!
कल्याण, बातमीदार :
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या शाळेतील माजी विध्यार्थ्यानी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवता याव्यात यासाठी 4 डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या सभेस हजेरी लावली. यामध्ये जितेंद्र पड्याल, डिंपल शाह, श्याम गाडेकर, कविता मोरे, अविनाश मनपाडे असे 14 माजी विध्यार्थी उपस्थित होते.
विध्यार्थ्यांचे कोरोना काळात मोठे शैक्षणिक नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी व विध्यार्थी हजेरी वाढविण्यासाठी माझी विध्यार्थ्यांनी विशेष अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्या साठी प्रत्यकी 5 विध्यार्थी दत्तक घेऊन त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.शाळेची हुशार माजी विध्यार्थीनी डिंपल राज ईने विध्यार्थ्यांना इंग्लिश स्पिकिंगचे वर्ग घेण्यास तयारी दर्शवली.
तथापि शाळा BMC च्या इमारतीत भरते शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे वर्ग खोल्यांचे भाडे थकले जाते असे शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी सांगितले.
हे ऐकल्यावर माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
लगेच याची अंमलबजावणी म्हणून 8 डिसेंबर ला इयत्ता 8 वी 9 वी व 10 वी च्या विध्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले.
शाळेला 100%निकालाची परंपरा आहे. आणि या वर्षी सुध्दा 100% निकाल लागेल असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला. मासुम संस्थेची शाळेला वेळोवेळी खूप मदत होते. शालेय वस्तूच्या गरजा, मिड-डे मिल, शिक्षक या व इतर सुविधा पुरवल्या जातात. शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर, सहा. शिक्षक श्री खैरनार सर, श्री घाटकर सर, श्रीमती बामणे मॅडम श्री धादवड सर यांनी नाईट शाळेच्या उन्नती साठी सेवाभावी संस्थानी पुढे येऊन मदत करावी जेणे करून नाईट शाळेचा विध्यार्थी शैक्षणिक दृष्टया समृद्ध होईल व देशाचा उत्तम नागरिक बनेल.
शेवटी मुख्याध्यापक राऊत सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment