३० हजार शिक्षक- शिक्षकेतरांच्या हितासाठी समता पॅनेलच्या पाठीशी- अनिल बोरनारे
समता पॅनल ला कल्याणच्या शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद !!
"शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी, गृहप्रकल्प, पर्यटन, मोबाईल बँकिंग, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना राबविणार"
कल्याण, ऋषिकेश चौधरी : मुंबई ठाणे व राज्यातील सुमारे ३० हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी व उन्नतीसाठी समता पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले.
सेकंडरी स्कूल एम्प्लॉयीज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत समता पॅनेलच्या प्रचारासाठी आज सकाळपासून अनिल बोरनारे यांनी कल्याण शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालय, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, द्वारका विद्यामंदिर, विश्वास विद्यालय, पावशे विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद संस्था, श्रीमती वेणूबाई अंबो पावशे विद्यालय, रॉयल प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय, गजानन विद्यालय मधील शिक्षक- शिक्षकेतरांशी अनिल बोरनारे, एन एम भामरे व सुभाष सरोदे यांनी संवाद साधला.
मागील पंचवार्षिक मध्ये दिलेल्या जाहीरनाम्यातील ९९ टक्के आश्वासने समता पॅनलने पूर्ण केली आहेत. उर्वरीत लवकरच पूर्ण करण्यात येतील.
मध्यम मुदत कर्जाची मर्यादा रु. ३५ लाख करणार. हायर पर्चेस कर्जाची मर्यादा रु. ३ लाख करणार, सभासदांना कर्ज सुलभ पद्धतीने व तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न, मुंबई बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, कर्जावरील व्याजाचा दर कमी करणार, सभासदांच्या पाल्यासाठी उच्च शिक्षण व परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना चालू करणार, सभासदांसाठी सहकार तत्वावर पर्यटन विभागाअंतर्गत देशाअंतर्गत व देशाबाहेर (सहल / ट्युरिझम) चालू करणार, सभासदांना त्वरीत कर्ज वितरणासाठी कर्जाची रक्कम, ठेवी व ठेवीवरील व्याज RTGS / NEFT / द्वारे सभासदांच्या खात्यात वर्ग करु. ATM सुविधा चालू करणार, सभासदांसाठी मोबाईल बँकीग सुविधा सुरु करण्यात येईल, सभासदांची वर्षातून एकदा संपूर्ण शारीरिक तपासणी (बॉडी चेकअप) मोफत सुविधा सुरु करण्यात येईल. सभासदांसाठी कॅशलेस मेडिक्लेम पॉलीसी सुरु करण्यात येईल, सभासद व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकिय सेवा सुविधा मिळण्यासाठी नवीन योजना चालू करणार, संस्थेचे ग्राहक भांडार सुरु करणार, संस्थेच्या सभासदांसाठी विभागवार / शाखानिहाय सभासदांना बचतीचे महत्त्व व सहकाराचे अधिक ज्ञान मिळण्यासाठी तज्ञमार्गदर्शकांकडून शिबीराद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. संस्थेच्या सभासदांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास एक रक्कमी एकदा रु.२५,०००/- मुदत ठेव करणार, सभासद जीवन सुरक्षा ठेव योजना चालू केली आहे. कर्जदार सभासदांचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांनी घेतलेले कर्ज माफ केले जाते. त्यामुळे जामीनदार व वारसास कर्जाची परतफेड करावी लागत नाही. दर योजनेमध्ये सभासदांच्या हिताचे आवश्यक ते बदल करण्यात येतील, जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत रक्कमेवर बचत ठेवीचे व्याज देणार, महाबळेश्वर येथे सभासदांना लवकरात लवकर अल्पदरात राहण्याची उत्तम सोय करणार, निवृत्त सभासदांचे मानधन रु.२०००/- वरून रु.५०००/- करणार, सभासदांसाठी यापूर्वी गृहप्रकल्प राबविण्यात आले आहेत व यापुढेही गृहप्रकल्प राबविण्यात येणार, सभासदांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment