Saturday, 18 December 2021

७ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर !!

७ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने आयोजित सातवे ग्रामीण साहित्य संमेलन हे लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील प्रभानवल्ली खोरनिनको या गावी ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान हे साखरपा गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर हे भूषवणार आहेत.
           ज्येष्ठ कवी अशोक लोटणकर यांची ललित गद्य, कथा, कविता, समीक्षा, बाल वाङमय इ. साहित्य प्रकारातील एकूण १८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या साहित्य कृतींना  नामांकित संस्थांचे २५ हून अधिक मानाचे वाङमय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. लोटणकर हे कोकणातील असल्याने अध्यक्ष स्थानी त्याची निवड झाल्यामुळे त्यांचे साहित्यिक मित्रांकडून अभिनंदन केले जात आहे. लोटणकर हे बी.ई.एस.टी. मुंबई मधून 'डेपो मॕनेजर' या पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत.

1 comment:

  1. अभिमानास्पद बातमी वाचून आनंद झाला.
    अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
    मी सध्या लांजे मुक्कामी आहे परंतु इच्छा असूनही नेमका ह्या सम्मेलना दरम्यान पूर्वनियोजित कामामुळे बाहेर जाणे होणार असल्याने प्रत्यक्ष हजेरी लावता येणार नाही. क्षमस्व.
    आपल्या या सन्मानाचा सार्थ अभिमान वाटतो.

    ReplyDelete

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...