न्यायालयाने बैल शर्यतीवरील बंदी उठवल्याने बळीराजाने ढोल ताशांच्या गजरात केला जल्लोष साजरा !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : सात वर्षे पासून बैल शयैतिवर न्यायालयाने बंदी घातली होती, अखेर आज न्यायालयाने बंदी उठवून बैल शयैतीला नियम व अटी घालून परवानगी दिली आहे, त्या मुळू बळीराजा अंनदित झाला आहे, डोंबिवली मोठा गाव येथे रूबाब ग्रुपने ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आंनद साजरा केला.
पूर्वी पासून बैल गाडी शयैती सुरू होत्या, बैल शयैतीत बैलांचा अमानुष छळ केला जातो, लाकडी काडीला पुढे चुक लावुन, परा़डीने बैलांना टोचत असत, याबाबत प्राणी मात्र संघटनांनी न्यायालयात धाव घेऊन बैल शर्यतीवरील बंदी आणवी अशी याचीका दाखल केली होती.
न्यायालयाने बाजू तपासून बैल शर्यतीवर बंदी घातली जवळपास सात वर्षे झाली, बैल गाडी शर्यती पुन्हा सुरु करण्यात याव्यात या करिता शासनाकडे तसेच न्यायालयात पाठपुरावा सुरू होता, अखेर न्यायालयाने काही शर्ती, अटी, नियम लादून बैल गाडी शर्यतीस परवानगी दिली आहे.
सदर घटनेचे वूत्त, बळीराजाला समजताच आनंद झाला,
डोंबिवली मोठा गाव येथे रुबाब ग्रुपने ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळून पेढे वाटून आनंद साजरा केला, यावेळी दिनेश म्हात्रे यांनी सांगितले की न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, नियम व अटी पाळून शर्यती सुरू करु, सात वर्षे पासून शर्यतींवर बंदी होती, ती आता उठवण्यात आली आहे, ज्या प्रमाणे दिवाळी व दसरा आनंद साजरा करतो त्या प्रमाणे आज आम्हा बळीराजाला आनंद झाला आहे, बैल शर्यतीची खूप आवड लहानपणापासून आहे.





No comments:
Post a Comment