घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर अत्त्याचार करणाऱ्या पतीला, पत्नीने पाठविले जेलमध्ये.!!
भिवंडी, दिं,16, अरुण पाटील (कोपर) :
घरी घरकाम करणाऱ्या मुलीवर पती घरातच अत्याचार करत असल्याचे पत्नीला समजले
असता पतीला चांगलीच अद्दल घडवली असून पत्नीने पतीला जेलमध्ये पाठवल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे.
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने घरात व जंगलात नेऊन बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लडकू मुकणे असं या नराधम आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीचे सहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले तर तिची आईही पर-पुरुषासोबत एकटीला सोडून निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या असाह्य पीडिताला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आरोपी. लडकू याने नातवंड आणि घरच्या बकऱ्या चरण्यासाठी तिला कामाला ठेवले होते.
त्यातच मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी मालक लडकू याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन बलात्कार केला. मात्र जिवाच्या भीतीने पीडित घाबरल्याची पाहून आरोपी लडकू हा तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होता.
पीडित अल्पवीयन मोलकरीण मालकाचा अत्याचार जिवाच्या भीतीने सहन करीत होती. त्यातच 13 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक लडकू राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला होता. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्यची हकीकत सांगत "माझ्या पतीने आमच्या घरी राहणारी मुलगी बरोबर बळजबरीने संबंध करत आहे, काहीतरी करा" असे सांगितले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचले व मुलीची सुटका करून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी लडकूला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा अत्याचारासह पोक्सो व इतर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गणेशपुरी पोलीस करत आहे.

No comments:
Post a Comment