कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि.) च्या वतीने 'समाजरत्न गौरव २०२२' सन्मानित !!
कल्याण, बातमीदार : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संकटात आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अतिशय शांततेने, जबाबदारीने प्रशासकीय यंत्रणा हाताळत कोरोना नियंत्रणात आणत अनेक नागरीकांना या संकटातून बाहेर काढले व्यवहार ठप्प झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा रोष असो, अथवा नोकरी ला जाणारा सर्वसामान्य नागरिक ,कोरोना बंधनामुळे त्रस्त घरातील माणसे अशा अनेक रोषांना सामोरे जात, सरकारी व खाजगी हॉस्पिटल यांच्यावर नियंत्रण ठेवत वारेमाप बिल देऊन नागरीकांना त्रस्त करणाऱ्या हॉस्पिटलांना दणका देत, ऑक्सीजन तुटवडा असो अथवा बेडची कमतरता असो, आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांचे उपचार व विलगीकरण टाटा आमंत्रन सारख्या बिल्डिंग मध्ये करून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार दिला, डॉक्टर, नर्स स्वच्छता कर्मचारी, पोलीस बांधव यांच्याशी सदैव संपर्कात राहून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात ठेवली, या कठीण प्रसंगातही ते अत्यंत शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा व संपर्कात राहूण समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते, ज्याचा मी साक्षीदार आहे कोरोनाचे नियम तंतोतंत पाळत नागरीकांना अतिशय शांततेने व संयमाने हाताळत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले, लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर ती अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय नियोजन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त लसीकरण आपल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आपल्याला यश आले आणि या यशाचे खरे गमक म्हणजे आज कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे, आपल्या सर्वांच्या जीवनातील अतिशय कठीण काळ होता जिंकू किंवा मरू अशी भयानक वास्तव परिस्थिती होती.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली परंतु त्याच बरोबर त्यांनी सर्वपक्षींयाना सांभाळण्याची तारेवरची कसरत खर्या अर्थाने केली यात काही शंका नाही. या काळामध्ये आयुक्तांनी जबाबदारी ज्या कुशलतेने हाताळली त्यासाठी आपल्या सर्व कल्याण डोंबिवली नागरिकांच्या वतीने खऱ्या अर्थाने ते गौरवास पात्र आहेत या निमित्ताने स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि.) वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी
केलेले उल्लेखनीय व वैशिष्टयपूर्ण कार्य समाजाला प्रेरणा व स्फूर्ती देणारे आहे.
याबद्दल स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि.)ने *समाजरत्न गौरव सन्मान 2022* देऊन सन्मानित केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष, स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, ज्येष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर , संस्थेच्या विश्वस्त शिल्पा तांगडकर, संस्थेचे विश्वस्त तानाजी करपे, महाराष्ट्र टाईम्स पत्रकार राजलक्ष्मी पुजारे उपस्थित होते यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र टाइम्स राजलक्ष्मी पुजारे यांचा *हिरकणी गौरव सन्मान 2022* देऊन गौरव करण्यात आला त्या मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातून निर्भिडपणे लेखन करत असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवर वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून करत आहेत.


No comments:
Post a Comment