भरधाव एक्सप्रेस समोर जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे पोलिसांनी वाचवला जीव !!
कल्याण, हेमंत रोकडे : एका तरुणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. रेल्वे फलाटावर गस्तीवर असल्या रेल्वे पोलिसाने तात्काळ रेल्वे रुळावर उडी मारत तरुणाला रुळापासून बाजूला केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुणाला वाचवणारा पोलीस कर्मचारी हा बदलापूरचा रहिवासी आहे.
मिळालेल्या महितीनुसाठी, कुमार गुरुनाथ पुजारी असे रेल्वे रुळात उडी मारणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचे नाव असून तो उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहतो.बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास कुमार हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर येऊन उभा राहिला. कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. फलाटावर गस्ती घालत असलेल्या
ऋषिकेश चंद्रकांत माने या रेल्वे पोलिसांने प्रसंगावधान दाखवत रेल्वे उडी घेतली आणि या तरुणाला रुळापासून बाजूला केले. माने यांनी केलेल्या धाडसाने एका तरुणाचा जीव वाचल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त विजय दरेकर साहेबांनी सुध्दा त्याच्या हिम्मतीचे कौतुक केले आहे.
कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
----------------------------------------------


No comments:
Post a Comment