Saturday, 19 March 2022

डोंबिवलीमधील सराईत गुंड स्थानबध्द !!

डोंबिवलीमधील सराईत गुंड स्थानबध्द !!


डोंबिवली, हेमंत रोकडे : डोंबिवली मानपाडा पोलीसच्या हद्दीत राहत असणाऱ्या २४ वर्षीय सराईत गुंडास एमपीडीए अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थानबध्दतेची कारवाई करून एक वर्षाकरिता त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
     डोंबिवली पूर्वेतील जयमल्हार नगर कुप्रसिद्ध गुंड त्रिशांत साळवे (२४) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव असून त्याच्यावर शिवीगाळ, दमदाटी, मारहाण, महिलांचे विनयभंग, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र वापरुन दंगा करणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, दंगा करुन मालमत्तेचे नुकसान करणे, गृह अतिक्रमण करून आपखुषीने दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे, ई. शरीरा विरूध्द गंभीर स्वरूपाचे एकुण ८ गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. 'ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह' यांनी शहरात दहशत  पसरविणार्‍या सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...