Monday, 25 April 2022

सप्तरंगी कोकण कला मंच (मुंबई) महाराष्ट्र दिनानिमित्त विरार नगरीत सादर करणार कोकणची लोककला !!

सप्तरंगी कोकण कला मंच (मुंबई) महाराष्ट्र दिनानिमित्त  विरार नगरीत सादर करणार कोकणची लोककला !!


मुंबई, (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर) :
             अनादी काळापासून पुर्वजांनी जपून ठेवलेला संस्कृतीचा वसा तरुणाईकडे सुपुर्द करत अनेक कलामंच आणि नमन मंडळांनी तो प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. त्यातिलच हा कलामंच त्यास योग्य तो न्याय देण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. नमन या लोककलेला लोकाश्रय मिळाला खरा परंतु राजाश्रय अजून मिळाला नाही. नमन हि लोककला कोकणातील बहुतांश गावोगावी चालते.


          गेली दोन वर्षे कोरोनाच्या विळाख्यात अडकलेल्या या लोककलेला आणि कलावंतांना आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे. लॉकडाऊन आधी सप्तरंगी कोकण कला मंचाने पन्नास यशस्वी कलाकारांसोबत विरारच्या मायानगरीत यशस्वी दोन प्रयोग हाऊसफुल्ल सादर केले आणि दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर लोकाग्रहास्तव आणि नवोदित कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावं या हेतूने आणि रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा तोच यशस्वी पन्नास कलाकारांचा ताफा दि. १ मे २०२२ रोजी. सायं ०७:०० वा. ठकिबाई गार्डन हॉल, आर.जे. हिल पार्क रोड, आर.जे बारच्या बाजूला विरार (पुर्व) या ठिकाणी सज्ज होऊ पाहत आहे. या वर्षी  एका सत्य घटनेवर प्रकाश टाकत ह्रदयाला स्पर्श करणारी श्री.सुनिल घेवडे संकल्पित, कु.मिलिंद ठिक लिखित आणि श्री.मिथुन रोकडे दिग्दर्शित एक काल्पनिक रोग मतभेदांचा,शोध मृत्युचा हि नाट्यकलाकृति सादर होणार आहे. या साठि श्री.गणेश घेवडे कलामंच प्रमुख तर श्री.संतोष कुरटे हे निर्माता म्हणून मुख्य भुमिका बजावणार आहेत.
             या सर्व कलाकरांना कोकणातील कमी वेळात लोकांच्या कंठातील तायित बनलेले कला, क्रीडा, आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गुहागर तालुक्यातील नरवण गावचे सुपुत्र माननीय श्री.संतोषजी जैतापकर यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी मोलाची संधी उपलब्ध करून दिली आहे.तरी आजचं आपलं आसन बुक करून आपण न विसरता हा दैदिप्यमान नमन कार्यक्रम पहायला यावं अशी विनंती सप्तरंगी कोकण कलामंच यांनी केली आहे. अधिक माहिती व तिकीट साठी सुनील घेवडे - 8097429633, मिथुन रोकडे- 8779567380, संतोष कुरटे- 9702499085, विजय माटल- 9594657983, साक्षी नलावडे - 7385434869 यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...