Monday, 25 April 2022

कु. सुप्रिया संतोष दळवी हिने मेहनतीने आणि जिद्दीने मिळवली एम. बी. ए पदवी !!

कु. सुप्रिया संतोष दळवी हिने मेहनतीने आणि जिद्दीने मिळवली एम. बी. ए पदवी !!


[ निवोशी/ गुहागर- उदय दणदणे ] :

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र ह.भ.प. श्री. संतोष रामचंद्र दळवी यांची कन्या कुमारी सुप्रिया संतोष दळवी हिने मुंबई सारख्या शहरात राहून प्रचंड मेहनत करून तसेच खूप अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एम.बी. ए (MBA) पदवी परीक्षेत पास झाली. सुप्रिया दळवीने आपल्या नावाबरोबर, आपल्या आईवडिलांचे, गावाचे, समाजाचे नाव रोशन केले आहे. सुप्रिया शालेय शिक्षण घेत असताना पासूनच खूप हुशार आणि जिद्दी होती. मुंबई सारख्या शहरात आपल्या मुलांना शिक्षण देणे सर्व सामान्य माणसांना परवडत नसतांना सुध्दा सुप्रियाच्या वडीलांनी खूप मेहनत करून सुप्रियाला एम.बी.ए. (MBA) चे शिक्षण दिले. सुप्रियाने पण खूप मेहनत घेतली,तिच्या मेहनतीला यश आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...