माजी नगरसेविका शीतल महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते जेतवन नगर येथे विकास कामांचे भूमिपूजन !!
*नगरसेविका शितल महेंद्र गायकवाड यांच्या प्रयत्नाने ६५ लाख रुपये निधी मंजूर*
मोहने, संदीप शेंडगे : कडोंमपा अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. १२ जेतवननगर येथे गटारे व नाले या विकास कामांचे भूमिपूजन माजी नगरसेविका शीतल महेंद्र गायकवाड व आरपीआय शहर अध्यक्ष माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
जेतवन नगरच्या सर्वांगीण विकासाकरिता जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून माजी नगरसेविका शीतल महेंद्र गायकवाड व माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड प्रयत्नशील होते शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांनी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत 65 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला.
या निधीमधून जेतवन नगर, समता मार्ग कातकरी पाडा, राहूल नगर, धम्मदीप नगर आदी भागातील गटारे व नाले तयार करण्यात येणार आहेत.
इतर प्रभागांच्या मानाने जेतवन नगर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून अजूनही अनेक कामे प्रलंबित आहेत लवकरच सर्व कामे मार्गी लागतील असे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वाधिक निधी आपल्या प्रभागांमध्ये आणल्याने शितल महेंद्र गायकवाड यांचे येथील नागरिकांनी आभार व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी वार्ड क्र. १२ चे अध्यक्ष आनंद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुशील आरके, मल्लिकार्जुन आरेंकर करण रातांबे कुणाल राताबे, यांसह जेतवन नगर परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उद्घाटनास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment